Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

Bappa Majha Song:दिव्या कुमार यांच्या दमदार आवाजातील ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. गाण्यात भक्तीसोबत सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2026 | 12:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bappa Majha Song: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांसाठी एक नवा संगीतमय नजराणा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘वीरता प्रॉडक्शन’च्या ‘बाप्पा माझा’ या नव्या गाण्याने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध गायक दिव्या कुमार यांच्या दमदार आवाजातील या गाण्याने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

राजे यशोवर्धन यांचं पदार्पण

‘बाप्पा माझा’ या गाण्याच्या माध्यमातून राजे यशोवर्धन यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यांच्यासोबत रितेश कांबळे आणि अंकिता मेस्त्री प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.

गाण्याची कथा तीन गणेशोत्सवप्रेमी तरुणांभोवती फिरते. गणेशोत्सवाचे खास क्षण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून टिपण्यासाठी हे तरुण खेडेगावात पोहोचतात. गावात साधेपणाने आणि आपुलकीने साजरा होणारा गणेशोत्सव ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.

सोशल मीडियातून घडवला सकारात्मक बदल

गावात फिरत असताना या तरुणांना एका शाळेची बिकट परिस्थिती दिसते. शाळेच्या दुरुस्तीसाठी ठेवलेली दानपेटीही त्यांच्या नजरेस पडते. शाळेची अवस्था पाहून ते त्यावर व्हिडीओ तयार करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात.

पाहता पाहता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. त्यानंतर बाप्पाच्या कृपेने शाळेच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मंजूर होतो. त्यामुळे भक्ती आणि गणेशोत्सवाच्या उत्साहासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवता येतो, असा सुंदर संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.

Drishyam 3: विजय साळगावकरची कथा इथेच संपणार? ‘दृश्यम 4’बाबत दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा

दिव्या कुमार यांच्या आवाजाने गाण्याला खास रंग

‘बाप्पा माझा’ हे गाणं बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक दिव्या कुमार यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. तर तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले संगीतकार-गीतकार प्रशांत नाकती आणि करण सावंत यांनी गाण्याचं संगीत आणि बोल तयार केले आहेत.

खेड्यापाड्यात साधेपणाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची सुंदर झलक या गाण्यात पाहायला मिळते. रोहित जाधव यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, सध्या सोशल मीडियावरही या गाण्याची चर्चा सुरू आहे. गाण्याच्या निर्मितीची जबाबदारी स्मिता वीरेंद्रसिंग यांनी सांभाळली आहे.

चार दिवसांत 1 मिलियन व्ह्यूज

गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यासोबतच सामाजिक संदेश देणारं ‘बाप्पा माझा’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. गाण्याचे बोल आणि संगीत गणेशभक्तांना ठेका धरायला लावत असून, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत 1 मिलियन व्ह्यूज मिळवण्यात या गाण्याला यश आलं आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह, भक्ती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर मेळ साधणारं हे गाणं यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या प्लेलिस्टमध्ये स्थान मिळवत आहे.

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Web Title: Bappa majha song divya kumar 1 million views

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Ganesh Festival
  • New Song

संबंधित बातम्या

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल
1

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर या गोष्टींचे करा दान, ग्रहदोषांपासून मिळेल दिलासा
2

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर या गोष्टींचे करा दान, ग्रहदोषांपासून मिळेल दिलासा

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
3

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
4

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.