Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Belraj Kalarickal: ‘कॉफी स्क्वॉड’ फेम मल्याळम दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचं वयाच्या २८व्या वर्षी निधन झालं. लग्नानंतर महिन्याभरातच मृत्यू झाल्याने चित्रपटसृष्टीत शोककळा.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 18, 2026 | 12:19 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील तरुण दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं आहे. १७ ऑक्टोबर रोजी कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, नुकतीच प्रदर्शित झालेली ‘कॉफी स्क्वॉड’ ही वेब सीरिज त्यांच्या दिग्दर्शनातील पहिलीच कलाकृती होती.

हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह

बेलराज कलारिकल हे केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील मणिमाला येथील रहिवासी होते. ते कोची येथील एका हॉटेलमध्ये मालिकेचे दिग्दर्शक श्रीकांत यांच्यासोबत राहत होते. अनेकदा बेल वाजवूनही बेलराज यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निधनाच्या काही दिवस आधीच प्रदर्शित झाली वेब सीरिज

बेलराज कलारिकल यांनी दिग्दर्शित केलेली ‘कॉफी स्क्वॉड’ ही वेब सीरिज १५ ऑक्टोबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते, तर एकूण ३६ भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. दिग्दर्शन क्षेत्रात नुकतीच सुरुवात केलेल्या बेलराज यांच्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, त्यांच्या निधनाच्या बातमीने या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.

बेलराज यांच्या निधनानंतर जिओ हॉटस्टारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. “काही निरोप खूप लवकर येतात. बेलराज कलारिकल, तुमच्या आत्म्यास शांती लाभो,” अशा शब्दांत प्लॅटफॉर्मने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Kapil Sharma Dubai Cafe: कपिल शर्माच्या दुबईतील कॅफेत सर्वात स्वस्त पदार्थही ₹४९० चा! महागड्या मेन्यूची सर्वत्र चर्चा

राहुल रिजी नायर यांनी व्यक्त केला शोक

चित्रपट निर्माते आणि अभिनेते राहुल रिजी नायर यांनीही बेलराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी बेलराज यांचा उल्लेख एक दूरदृष्टी असलेला चित्रपट निर्माता, जवळचा मित्र आणि सर्जनशील सहकारी असा केला.

राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘कापी स्क्वॉड’चे दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. फर्स्ट प्रिंट स्टुडिओच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या बेलराज यांनी आपल्या कामातून प्रॉडक्शन हाऊसची ओळख घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चित्रपट निर्मितीप्रती असलेली त्यांची निष्ठा, समर्पण आणि उत्साह यांचा त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठा प्रभाव होता.

बेलराज यांच्याशिवाय फर्स्ट प्रिंट स्टुडिओ अपूर्ण राहील, अशी भावनिक प्रतिक्रिया राहुल यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांनी दिवंगत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली.

सहाय्यक म्हणूनही केलं होतं काम

दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवण्यापूर्वी बेलराज यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत सहाय्यक म्हणून काम केले होते. ‘निझाल’, ‘मधुरम’ आणि ‘डाकिनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी योगदान दिले होते. तसेच ‘डाकिनी’, ‘कीडम’ आणि ‘खो खो’ यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांनी राहुल रिजी नायर यांना सहाय्य केले होते.

फर्स्ट प्रिंट स्टुडिओशी संबंधित असलेल्या त्यांच्या कामाचा प्रवासही उल्लेखनीय होता. या प्रॉडक्शन हाऊसचा पुरस्कारप्राप्त ‘ओट्टामुरी वेलिचम’ आणि ‘केरळा क्राईम फाईल्स’ यांसारख्या प्रकल्पांशी संबंध राहिला आहे.

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला

बेलराज कलारिकल यांच्या वैयक्तिक आयुष्यातही नुकतीच एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. सहा वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर त्यांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी अथीरा बिंदू साबू यांच्याशी विवाह केला होता. लग्नाला अवघा एक महिना उलटत असतानाच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे त्यांच्या पत्नीवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी दिग्दर्शन क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या बेलराज कलारिकल यांच्या अकाली निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीने एक होतकरू कलाकार गमावला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील मित्र, सहकारी आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Belraj kalarickal death coffee squad director ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Death
  • entertainment
  • Film Director

संबंधित बातम्या

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा
1

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
2

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Kapil Sharma Dubai Cafe: कपिल शर्माच्या दुबईतील कॅफेत सर्वात स्वस्त पदार्थही ₹४९० चा! महागड्या मेन्यूची सर्वत्र चर्चा
3

Kapil Sharma Dubai Cafe: कपिल शर्माच्या दुबईतील कॅफेत सर्वात स्वस्त पदार्थही ₹४९० चा! महागड्या मेन्यूची सर्वत्र चर्चा

Rakhi Sawant: १६ वर्षांपूर्वीचं प्रकरण राखी सावंतला भोवलं! न्यायालयाचा मोठा निर्णय, अजामीनपात्र वॉरंट जारी
4

Rakhi Sawant: १६ वर्षांपूर्वीचं प्रकरण राखी सावंतला भोवलं! न्यायालयाचा मोठा निर्णय, अजामीनपात्र वॉरंट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.