Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhumi Pednekar : चित्रपट समाजाचे प्रतिबिंब! विविध विषयांवर व्यक्त झाली भूमी पेडणेकर; ‘हिंसा किंवा अश्लीलता…’

भूमी पेडणेकर हिने 'नवभारत कॉन्क्लेव्ह २०२६'मध्ये कलाकारांनी समाजाप्रती जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे सांगितले. चित्रपट समाजाचे प्रतिबिंब असल्याचे सांगत, केवळ व्ह्यूजसाठी हिंसा किंवा अश्लीलतेचा वापर करणे अयोग्य असल्याचे तिने स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2026 | 04:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चित्रपट समाजाचे प्रतिबिंब – भूमी
  • ट्रोलिंगविरोधात कडक नियमांची मागणी
  • पालकांची जबाबदारी महत्त्वाची – भूमी
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने ‘नवभारत कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर बोलताना कलाकार म्हणून देशाप्रती असलेली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे ती म्हणाली. कलाकारांकडे त्यांच्या कलेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची ताकद असल्याचेही तिने नमूद केले. चित्रपटांमध्ये वाढत्या हिंसा आणि शिवीगाळीच्या वापराबाबत विचारले असता भूमीने स्पष्ट केले की, चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असतात आणि वास्तव मांडणे ही चित्रपट निर्मात्यांची जबाबदारी आहे. आपण कलात्मक स्वातंत्र्याचे समर्थन करत असलो तरी केवळ प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी अनावश्यक हिंसा अथवा अश्लीलता दाखवणे योग्य नसल्याचे तिने सांगितले. सेन्सॉरशिपपेक्षा पालकांनी मुलांना कोणता आशय पाहू द्यायचा याबाबत अधिक सजग राहण्याची गरज असल्याचेही तिने अधोरेखित केले.

Maniesh Paul Mother Death: “आज जग शांत वाटतंय…”, मनीष पॉलच्या आयुष्यात मोठी पोकळी; आईच्या आठवणीत भावूक झाला अभिनेता

भविष्यातील कारकिर्दीबाबत बोलताना भूमीने स्वतःला अजूनही “एक छोटी आणि भुकेली कलाकार” असल्याचे सांगितले. अजून खूप काही शिकायचे आणि मोठे काम करायचे आहे, असे नमूद करत तिने ‘मदर इंडिया २’सारख्या भव्य चित्रपटाचा भाग बनण्याची इच्छा व्यक्त केली. समाजात वाढत असलेल्या महिला अत्याचार, शोषण आणि गंभीर गुन्ह्यांबाबतही भूमीने चिंता व्यक्त केली. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा, आवश्यक असल्यास मृत्युदंडाची तरतूद असावी, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल, असे ती म्हणाली. यासोबतच सोशल मीडियावरील आशयावर प्रभावी नियंत्रण आणि कठोर नियमांची आवश्यकता असल्याचेही तिने सांगितले. मुलांवर चुकीचा परिणाम होऊ नये यासाठी सरकार, पालक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे तिने नमूद केले.

डिजिटल युगातील ट्रोलिंग आणि ऑनलाइन बुलिंग हा सध्या मोठा सामाजिक प्रश्न बनत असल्याचेही भूमीने सांगितले. इंटरनेटवरील ट्रोलिंगला तिने थेट छळ (Harassment) असे संबोधले. विशेषतः लहान मुले आणि तरुणांवर याचा गंभीर मानसिक परिणाम होत असल्याने त्यांच्यासाठी सक्षम यंत्रणा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचे ती म्हणाली. शालेय जीवनात तसेच नंतर स्वतःलाही ऑनलाइन बुलिंगचा सामना करावा लागल्याचा अनुभव तिने यावेळी शेअर केला. युवकांना संदेश देताना भूमी म्हणाली की, ट्रोल करणारे अनेकदा स्वतःच असुरक्षित आणि भीतीग्रस्त असतात. त्यामुळे त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे खचून न जाता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे.

Zee Marathi Serial: ‘दीपज्योती’ आणि ‘शुभ श्रावणी’मध्ये येणार मोठे ट्विस्ट; नात्यांची होणार कठीण परीक्षा

मानसिक आरोग्याच्या विषयावर बोलताना भूमीने सहानुभूती (Empathy) आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता (Vulnerability) हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगितले. पालकांनी मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि एखादे मूल ‘मी त्रस्त आहे’ असे सांगत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन तिने केले. स्वतःच्या आयुष्यात आई-वडिलांनी कायम पाठिंबा दिला आणि स्वप्नांवर विश्वास ठेवला, त्यामुळेच आपला आत्मविश्वास टिकून राहिल्याचे भूमीने सांगितले. ‘नवभारत कॉन्क्लेव्ह २०२६’मधील भूमी पेडणेकरच्या भाषणात विकसित भारताची संकल्पना, सामाजिक जबाबदारी, मानसिक आरोग्य, सुरक्षित समाज आणि जबाबदार मनोरंजन यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. तिच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Bhumi pednekar talks about lots of issues in in navbharat conclave 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • bhumi pednekar
  • Navabharat
  • Navbharat Conclave

संबंधित बातम्या

‘पुढील १००० वर्षांचे भविष्य भारत ठरवणार…’, नवभारत विकसित भारत कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. सुधांशू त्रिवेदींचे मोठे विधान
1

‘पुढील १००० वर्षांचे भविष्य भारत ठरवणार…’, नवभारत विकसित भारत कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. सुधांशू त्रिवेदींचे मोठे विधान

Viksit Bharat Leadership Conclave 2026: स्वागतपर भाषणात एमडी निमिष माहेश्वरी यांनी मांडला कार्यक्रमाचा दृष्टिकोन
2

Viksit Bharat Leadership Conclave 2026: स्वागतपर भाषणात एमडी निमिष माहेश्वरी यांनी मांडला कार्यक्रमाचा दृष्टिकोन

Bhumi Pednekar: ‘ट्रोलिंग, मेंटल हेल्थ आणि हवामान बदल…’, नवभारत कॉन्क्लेव्हच्या मंचावर भूमी पेडणेकरने मांडली रोखठोक मते
3

Bhumi Pednekar: ‘ट्रोलिंग, मेंटल हेल्थ आणि हवामान बदल…’, नवभारत कॉन्क्लेव्हच्या मंचावर भूमी पेडणेकरने मांडली रोखठोक मते

‘भारत आता इंधनाची आयात नाही, तर निर्यात करणार’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन
4

‘भारत आता इंधनाची आयात नाही, तर निर्यात करणार’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.