( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Bigg Boss 20 Nomination: सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये कोणत्याही स्पर्धकाला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला नाही. सलमान खाननेही पहिल्या ‘वीकेंड का वार’मध्ये स्पर्धकांसोबत मजामस्ती करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता मात्र आगामी एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉसने या आठवड्याचं नॉमिनेशन टास्कच रद्द केल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर तीन स्पर्धकांना थेट नॉमिनेट करण्यात आलं आहे.
‘बिग बॉस 20’च्या नव्या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धक ‘रूम नंबर 20’मध्ये बसलेले दिसत आहेत. यावेळी घरात नॉमिनेशनवर चर्चा सुरू असतानाच बिग बॉस नॉमिनेशन टास्क रद्द करण्याची घोषणा करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील महत्त्वाचा नियम मोडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनबाबत स्पर्धकांनी आपापसात चर्चा किंवा प्लॅनिंग करणं नियमबाह्य मानलं जातं. मात्र, नॉमिनेशनच्या प्रक्रियेदरम्यान आसिफ खान, रोहेद खान आणि स्काउट हे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करताना दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.
नॉमिनेशनसंदर्भात प्लॅनिंग केल्यामुळे बिग बॉसने आसिफ खान, रोहेद खान आणि स्काउट यांना थेट शिक्षा सुनावली आहे. नॉमिनेशन टास्क रद्द करण्यासोबतच या तिघांना थेट घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे.
त्यामुळे या आठवड्यात आसिफ खान, रोहेद खान आणि स्काउट हेच तीन स्पर्धक एलिमिनेशनच्या धोक्यात आहेत. आता ‘वीकेंड का वार’मध्ये या तिघांपैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ‘वीकेंड का वार’नंतरच्या एपिसोडमध्ये अरिश्फा खान आणि भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. दोघींनीही एकमेकींवर आपला राग व्यक्त केला. हा वाद इतका वाढला की अरिश्फाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि ती ढसाढसा रडताना दिसली.
या घटनेनंतर घरातील वातावरणही काही काळ तणावपूर्ण झालं.
पहिल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने काजी तौकीरचंही कौतुक केलं. काजीचा शोमधील अंदाज प्रेक्षकांना आवडत असून बाहेरही त्याची चर्चा होत असल्याचं सलमानने सांगितलं. त्यामुळे काजीला सलमानकडून मिळालेलं हे कौतुक त्याच्यासाठी विशेष ठरलं.
आता नॉमिनेशन टास्क रद्द झाल्यानंतर आसिफ खान, रोहेद खान आणि स्काउट यांच्यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये स्पष्ट होणार आहे.






