Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Bigg Boss 20: रॅपर Yung DSA ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन बनला आहे. कॅप्टन म्हणून घरातील नियम पाळण्यावरून Yung आणि कनिकामध्ये खडाजंगी झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. आता या वादामागचं नेमकं कारण काय आणि दोघांमध्ये काय घडलं, हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 11, 2026 | 03:29 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss 20: सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. मात्र, शोच्या सुरुवातीपासूनच घरात वेगवेगळ्या कारणांवरून वाद आणि चर्चांना सुरुवात झाली आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला असून, रॅपर Yung DSA ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन बनला आहे. मात्र, कॅप्टन होताच त्याचा अंदाज बदलल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये Yung DSA आणि अभिनेत्री कनिका मान यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. कॅप्टन म्हणून घरातील नियम पाळण्यावरून Yung आणि कनिकामध्ये खडाजंगी झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. आता या वादामागचं नेमकं कारण काय आणि दोघांमध्ये काय घडलं, हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

निर्मात्यांनी नुकताच शोचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये Yung DSA आणि कनिका मान यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. कॅप्टन झाल्यानंतर Yung चा हा वेगळाच अवतार पाहून घरातील इतर सदस्यही हैराण झाले आहेत.

वॉशरूमच्या मुद्द्यावरून सुरू झाला वाद

प्रोमोमध्ये Yung DSA वॉशरूममध्ये उभा राहून ईशा रिखीसोबत बोलताना दिसतो. यावेळी तो कनिका मानने पुरुषांच्या वॉशरूमचा वापर केल्याचा मुद्दा उपस्थित करतो.

Yung म्हणतो की, कनिकाला त्याने बाहेरून आवाज दिला, मात्र तिने त्याला उत्तर दिलं नाही. त्याच्या मते, कॅप्टन म्हणून त्याला किमान प्रतिसाद मिळायला हवा होता. यानंतर घरातील काही सदस्यही कनिकाला कॅप्टनचा आदर करण्याची गरज असल्याचं सांगताना दिसतात.

Promo: Kanika Mann vs Yung DSA 🔥🔥🔥 https://t.co/xe04XbgUqd — BBTak (@BiggBoss_Tak) September 10, 2026

 

कनिका मानने Yung DSAला सुनावलं

यानंतर Yung कनिकाला याबाबत जाब विचारतो. मात्र, कनिका स्वतःची बाजू स्पष्ट करताना त्याला सुनावते. ती म्हणते की ती फक्त पाणी सुरू करत होती आणि त्याने तिच्याशी शांतपणे बोलायला हवं होतं. एवढा गोंधळ करण्याची गरज काय, असा सवालही ती करते.

कनिकाच्या या उत्तरानंतर Yungचा पारा चढतो. “माझा अपमान झाला आहे आणि माझा अपमान म्हणजे घराच्या नियमांचा अपमान आहे. आता सगळ्यांना शिक्षा होईल,” असं तो म्हणताना दिसतो.

Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज

‘तू कॅप्टन आहेस, राजा नाहीस’

Yungच्या या भूमिकेवर कनिका मानही चांगलीच संतापते. “तू फक्त घराचा कॅप्टन आहेस, राजा नाहीस. आम्ही तुझी सेवा करायला आलेलो नाही,” असं म्हणत ती त्याला सुनावते.

यानंतर Yungही तिला प्रत्युत्तर देतो. “तू घरातून बाहेर पडल्यावर तुला कळेल की Yung कोण आहे,” असं तो म्हणताना प्रोमोमध्ये दिसत आहे.

आजच्या एपिसोडमध्ये रंगणार वाद

Yung DSA आणि कनिका मान यांच्यातील हा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कॅप्टन बनल्यानंतर Yungचा बदललेला अंदाज आणि कनिकासोबत झालेला वाद पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

या संपूर्ण प्रकरणावर 11 सप्टेंबरच्या ‘बिग बॉस 20’च्या एपिसोडमध्ये अधिक चर्चा होणार आहे. ‘बिग बॉस 20’चा एपिसोड JioHotstar वर रात्री 9 वाजता आणि Colors TV वर रात्री 10:30 वाजता पाहता येणार आहे.

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन

Web Title: Bigg boss 20 yung dsa kanika mann fight promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Bigg Boss 20
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक
1

Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.