
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20: अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली घटस्फोटानंतर देखील चर्चेत आले आहेत. या दोघांनी जानेवारीमध्ये अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केली. लग्नाच्या तब्बत १४ वर्षांनंतर विभक्त झालेलीह ही जोडी आजही एकमेकांचे चांगले मित्र असून ते त्यांच्या मुलांचा सांभाळ एकत्र( को- पॅरेंटिंग) करत आहेत. सध्या ‘बिग बॉस २० मध्ये माही विज स्पर्धक म्हणून झळकत आहे.
नुकत्याच एका एपिसोडमध्ये सिंगल मदर म्हणून तिचा संघर्ष आठवून ती ढसाढसा रडताना दिसली. तसेच, माजी पती जय भानुशालीकडून कोणतीही पोटगी न घेण्याच्या तिच्या निर्णयाबाबत तिने पुन्हा एकदा खुलासा केला आहे. माहीने सांगितले की, न्यायाधीशांनी तिला तिच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता, परंतु तिने तो स्वीकारला नाही कारण तिला माहित होते की तिने ते किती कष्टाने मिळवले आहे. आता जय भानुशालीने माही विजच्या भावनिक उद्रेकानंतर, जयने आता तिला पाठिंबा दर्शवणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
जयने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यात त्याने लिहिले, ”माही, खंबीर राहा. आपल्याला दोघांनाही माहित आहे की कठीण काळात आपण नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राह. आपल्यात कधीच पैशांचा प्रश्न नव्हता आणि कधी असणारही नाही. तू आणि तारा आयुष्यभर माझी जबाबदारी असाल. लग्नाचे बंधन तुमच्या दोघींबद्दलचे माझे प्रेम आणि आदर कधीही बदलू शकत नाही. मी नेहमी तुझ्यासोबत आहे.”
बिग बॉस २०च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एक एपिसोडमध्ये, अरिशफा खानसोबत झालेल्या भांडणानंतर माही विज आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्याशी बोलताना दिसली या संभाषणादरम्यान, आपली मुलगी ताराची आठवण काढून माहीला रडू कोसळले. ती म्हणाली, “अरिशफा खोटारडी आहे. मी माझ्या स्वतःच्या मुली ताराशी जशी बोलते, तसंच मला तिच्याशी बोलायचं आहे. पण ती खूप उद्धट आहे. त्या दिवशी मी तिला जे काही बोलले, त्याबद्दल मला वाईट वाटतं.” मी एकटी आई आहे आणि मी प्रत्येक दिवस कसा सांभाळते हे फक्त मलाच माहीत आहे. जयने तिला नेहमी पाठिंबा दिला आहे. तो नेहमी तिला बाहेर जाऊन मजा कर असं सांगायचा असं देखील तिने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणाली, ”माझा संपूर्ण दिवस तारासोबत घालवते. माझं संपूर्ण आयुष्य माझ्या मुलीभोवती फिरतं. मी पोटगी घेतलेली नाही, कारण मला माझ्या मुलीच्या भविष्याची काळजी स्वतःच घ्यायची आहे. मी जयकडे पैसेही मागत नाही, कारण मला माहीत आहे की त्याने ते कमावण्यासाठी किती मेहनत घेतली आहे.”
जय भानुशाली आणि माही विज यांनी २०१९ मध्ये लग्न केले आणि त्यांनी तीन मुले आहेत. त्यांनी २०१२ मध्ये त्यांनी ताराला जन्म दिला आणि २०१७ मध्ये या दोघांनी राजवीर आणि खुशीला दत्तक घेतले.