
फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी 6 म्हणजे एक कठीण कोडं! या शोमध्ये दररोज नवीन वळणे आहेत. या घरात शकडो दरवाजे आहेत. शो च्या सुरुवातीला शोचे होस्ट रितेश देशमुखे म्हणाले होते की या बिग बॉसच्या घरात 400 खिडक्या 900 दारं आहेत. म्हणजे एकंदरीत हे घर नसून एक चक्रव्यूहच आहे असे काही भास होते. बिग बॉस दर आठवड्यात कोणत्याना कोणत्या दाराची ओळख घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना करून देतच असतात, अशामध्ये बिग बॉसने शेअर केलेला एक प्रोमो सोशल मीडियावर तुफानी राडा करत आहे.
नक्की काय आहे त्या प्रोमोमध्ये?
शेअर करण्यात आलेल्या Promo मध्ये बिग बॉस सांगतात की “आज पर्यंत बिग बॉसच्या घरात अनेक दारं उघडली परंतु आता उघडणार आहेत खिडक्या!” हे सांगून ते पुढे म्हणतात की “या खिडक्यांतून कधी येईल संकट, कधी येतील आव्हाने तर कधी येतील पाहुणे, खिडकी उघडणार आणि सदस्यांना धडकी भरणार.” बिग बॉसचा हा नवा प्लॅन काय असणार याची माहिती प्रेक्षकांनाही नाही त्यामुळे घरातील सदस्य त्या सगळ्या गोष्टींना कसे सामोरे जातील? या गोष्टी महत्वाच्या ठरतील.
प्रेक्षकांनी त्यांचे मत सांगितले आहे. एका प्रेक्षकांचे म्हणणे आहे की “खेळ रंजक ठेवण्यासाठी आणि बुडण्यापासून वाचवण्यासाठी हे नवीन प्रताप असून, रुचिताला घराबाहेर काढून बिग बॉस टीमने फार मोठी चूक केली आहे” तर काही प्रेक्षकांनी आपापल्या आवडत्या सदस्याला चेअर अप केले आहे. तन्वी, राकेश, विशालसाठी बहुतेक प्रेक्षकांनी मते नोंदवली आहेत.
Bigg Boss Marathi 6 : यंदाचे Eviction टफ! एक नाही तर अनेक सदस्य होतील घराबाहेर, आता खेळ सुरु झालाय…
मल्टि एव्हीकेशन होणार !
दर आठवड्यात कुणा एकाला घर सोडावे लागते पण यंदाचा आठवड्यात एकापेक्षा अनेक जण Evict होणार असल्याचे बिग बॉस यांनी promo च्या माध्यमातून दिले आहे.