फोटो सौजन्य - Social Media
काय आहे त्या प्रसिद्धी पत्रकात?
मुख्य मायन्याच्यावर “राकेश बापट यांच्या कुटुंबियांकडून” असे शीर्षक म्हणून नमूद करून घडलेल्या प्रकारबद्दल त्यांच्या मनात असलेले भाव आणि बिग बॉस तसेच रितेश देशमुख यांच्याकडे असणारी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की “राकेशने संपूर्ण पर्वात बिग बॉस खेळाच्या सर्व नैतिक मूल्यांचा आदर राखला आहे आणि कोणत्याही वैयक्तिक मुद्य्यांवरून कधीही कुणाची अवहेलना केली नाही. विशालने आधीही वारंवार नियम मोडले आहेत पण यंदा सर्व हद्दीच मोडून काढल्या आहेत. त्याच्या या कृत्यावर अतिशय किरकोळ शिक्षा सुनावण्यात आली आहे. वैयक्तिक मुद्दे मुद्दाम उगारून काढणे हा कायदेशीर भंग आहे आणि तो अद्याप दुर्लक्षित राहिला आहे.”
राकेश बापट यांच्या कुटुंबीयांनी विशाल कोटियनवर बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. वैयक्तिक बाबींचा उल्लेख करून करारभंग केल्यामुळे त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शोमध्ये शारीरिक आणि शब्दिक चिथावणी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारावर अद्याप कठोर कारवाई न झाल्याने कुटुंबीय नाराज आहेत. शोची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
Nomination टास्क सुरु असताना राकेश यांनी अनुश्री आणि विशाल यांना ठोस कारणे देत Nominate केले. विशाल यांबद्दल सांगताना राकेश म्हणाले की “विशाल हा अहंकारी आहे. जरी त्याला त्याची ती बाजू स्वाभिमान वाटत असली तरी!” अचानक या भांडणाला नवीन लय आला आणि दोघांनी एकमेकांबद्दल आधी काढलेल्या वैयक्तिक बाबींची एकमेकांना आठवण करून देऊ लागले. त्यामध्ये विशालने राकेशच्या घटस्फोटावर Comment केली, त्यामुळे राकेशचाही तोल सुटला आणि विशालने आणखीन अरेरावी करत, राकेशच्या अंगावर धावत आला आणि त्याला धक्काबुक्की केली.






