निधीअभावी डायलिसीस उपचारांना ब्रेक लागणार? दररोज ७२६ डायलिसिस सत्रांची जबाबदारी, काही ठिकाणी सेवा खंडित
Health Update: मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हा नियमित उपचारांचा अविभाज्य भाग आहे. आठवड्यातून अनेकदा रुग्णालयात जाऊन हा उपचार घ्यावा लागतो. अशा रुग्णांसाठी राज्यात दररोज सरासरी ७२६ डायलिसिस सत्रे पार पडतात. मात्र, या महत्त्वाच्या आरोग्यसेवेचा आर्थिक भार सांभाळणाऱ्या सेवा पुरवठादारांची देयके थकल्याने काही केंद्रांमधील उपचार विस्कळीत झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी पर्यायी केंद्रांचा शोध घेण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर शासनाने निधी वितरणाची प्रक्रिया गतिमान केली असून, उर्वरित देयकेही लवकरच देण्याचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.(फोटो सौजन्य – AI)
महाडायलिसिस योजनेंतर्गत राज्यात १०८ केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. त्यापैकी सुमारे ६६ केंद्रे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून चालविली जातात. उर्वरित केंद्रांमध्ये अन्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केला जातो. २०२५-२६ या आर्थिक वर्षात शासकीय आरोग्य यंत्रणेच्या केंद्रांमध्ये १ लाख ६९ हजार २८१ डायलिसिस सत्रे झाली. तर एचएलएलमार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रांमध्ये ९५ हजार ६०७ सत्रे पार पडली. दोन्ही मिळून वर्षभरातील सत्रांची संख्या २ लाख ६४ हजार ८८८ इतकी आहे. ही सत्रांची संख्या असून, स्वतंत्र रुग्णसंख्या नाही.
काही केंद्रांमध्ये तांत्रिक बिघाड किवा अन्य कारणामुळे सेवा थांबल्यास रुग्णांना जवळच्या पर्यायी केंद्रांमध्ये उपचार देण्याची व्यवस्था केली जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, दोन दिवसांपासून ते दोन महिन्यांपर्यंत सेवा बंद असल्याच्या तक्रारी समोर येणे ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
Lung Care Tips : फुफ्फुसांचे आरोग्य राखायचे आहे? दररोज करा ही 4 सोपी योगासने
एका डायलिसिस सायकलसाठी सेवा पुरवठादाराला सुमारे १,५०० रुपये दिले जातात. त्यानुसार एका रुग्णाच्या महिन्याच्या उपचाराचा खर्च सुमारे १८ हजार रुपये होतो. खासगी रुग्णालयात एका डायलिसिससाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे सरकारी योजनेतील सेवा बंद पडल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
Ans: डायलिसिस ही मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित होत नसताना रक्तातील अतिरिक्त पाणी, क्षार आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याची वैद्यकीय प्रक्रिया आहे.
Ans: मूत्रपिंडांची कार्यक्षमता गंभीरपणे कमी झाल्यास शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यासाठी डायलिसिसची गरज भासू शकते.
Ans: रुग्णाची प्रकृती, मूत्रपिंडांचे कार्य आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डायलिसिसचे वेळापत्रक ठरते. अनेक रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते.






