फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉसच्या घरात दररोज नवं काही घडत आहे. अशामध्ये वीकेंडमुळे भाऊंच्या धक्क्यावर सगळ्या सदस्यांनीच दमछाक झालीये. रितेशने एकाएकाला धक्का दिला आहे. रितेशने प्रभूच्या चूकांनाही धारेवर घेतले आहे. त्यासंदर्भात एक प्रोमोही Bigg Boss ने शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश काय म्हणाले प्रभूला पाहुयात.
या प्रोमोमध्ये रितेश काय म्हणाले प्रभूला?
भाऊचा धक्का दिसून येत आहे. मंचावर रितेश आहे तर घरात सर्व सदस्य एकत्र बसले आहेत. दरम्यान, रितेशने प्रभूला धक्का दिला आहे. प्रभूच्या गेम Strategy वरून रितेश भडकला आहे. संताप व्यक्त करत प्रभूला म्हणाला की “वस्तू सगळ्यांच्या जवळ लपवून ठेवून त्यांना चोर सिद्ध करणे हा तुमचा गेम आहे का? ही तुमची गेम स्ट्रॅटर्जी आहे का?” तेव्हा प्रभूच्या चेहरा शांत दिसून आला पण त्यानंतर रितेश म्हणाला की “इथे ही सगळी मंडळी मोठं नाव कमावून आले आहेत, ते स्वतःला चोर म्हणवून घेण्यासाठी kaa?”. रितेश फार चिडलेला दिसून आला होता. अशामध्ये प्रभूच्या चाहत्यांनी तसेच बिग बॉसच्या प्रेक्षकांनी त्यांची मतं सोशल मीडियावर नोंदवल्याची दिसून आली आहेत.
एका प्रेक्षकांचं म्हणणं आहे की “प्रभूला सहानुभूतीवर मतं मिळत आहेत.” तर दुसऱ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे की “तन्वी सोबत राहणं प्रभूला एकेदिवशी महागात पडणार आहे. ” तर काहींनी घरातील सदस्यच प्रभूचा गैरवापर करत असल्याचे सांगितले आहे.
यंदाच्या आठवड्यात कोण जाईल घराबाहेर?
आज रविवार, आज घरामध्ये Eviction होणार आहे. गेल्या आठवड्यात रुचिता जामदार घराबाहेर पडली होती. यंदाच्या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे घराबाहेर जाण्याची शक्यता फार आहेत. विविध माध्यमांनी तसेच प्रेक्षकांनी देखील यंदा प्राजक्ता या घरातून बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे बाल्कनी ग्रुपचा एकच धुरंधर ‘सागर कारंडे’ घरात दिसून येणार आहे.






