सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य पीडित तरुणीला आरोपी मोहम्मद माजिन याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करत त्याने तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, आरोपीने अशाच प्रकारे आणखी १३ महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले. या सर्व महिलांकडून त्याने मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले; इतकेच नव्हे तर आरोपीने त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मोहम्मद माजिन हा कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी परदेशात पळून गेला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनंतर सीबीआयच्या इंटरपोल विभागाने त्याच्याविरोधात ‘रेड नोटीस’ जारी केली होती. या नोटीसच्या आधारे यूएईच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच सक्षम न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले आहे. अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या एका विशेष पथकाने यूएईमध्ये जाऊन आरोपीचा ताबा घेतला आणि २० नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला भारतात आणले.
दरम्यान, सीबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ पासून आतापर्यंत इंटरपोलच्या माध्यमातून परदेशात पळून गेलेल्या ३०० हून अधिक फरार आरोपींना भारतात परत आणण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. विशेष म्हणजे, एकट्या २०२६ या वर्षात आतापर्यंत ७४ फरार आरोपींचे भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले आहे.
Ans: लग्नाचे आमिष दाखवून १४ तरुणींचे शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद माजिन असून, २० नोव्हेंबर २०२६ रोजी त्याचे यूएईमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले.
Ans: मुख्य पीडितेची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यासह आणखी १३ तरुणींचे लैंगिक, मानसिक व आर्थिक शोषण करणे, पैसे उकळणे आणि त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.
Ans: महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयच्या इंटरपोल विभागाने जारी केलेल्या 'रेड नोटीस'च्या आधारे यूएई अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आणि महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकाने यूएईमधून त्याचा ताबा घेतला.






