सौजन्य फोटो - सोशल मिडीया
(वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर) असे खून झालेल्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. त्या हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आणि पांगारे येथून दररोज ये-जा करत असत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीचे आजाराने निधन झाले होते. पतीच्या खात्यावर ८ ते १० लाख रुपयांची रक्कम आणि सासवडमध्ये एक गुंठा क्षेत्र होते. यातील निम्मा हिस्सा आपल्याला मिळावा, यासाठी दीर शशिकांत माणिकराव काकडे आणि सासू सुलोचना माणिकराव काकडे (दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांनी तगादा लावला होता. यास उज्वला काकडे यांचा विरोध असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. याप्रकरणी गणेश दत्तात्रय मेमाणे (वय ३९, रा. श्रीलक्ष्मी इन्क्रेव्ह सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे पांगारे येथून हडपसरकडे जाण्यासाठी पायी बस स्टॅन्डकडे निघाल्या होत्या. याच दरम्यान दीर शशिकांत काकडे याने कॅरी गाडीने येऊन त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि विव्हळत खाली पडल्या. त्यानंतर आरोपीने गाडीतून उतरून जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला तसेच गाडीतील लोखंडी वस्तूने मानेवर प्रहार केले. प्रचंड जखमा आणि तीव्र रक्तस्त्रावामुळे उज्वला काकडे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी शशिकांत काकडे याने त्याच गाडीने पळ काढला आणि सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात गाडी सोडून डोंगराळ भागातून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या सूचनेनुसार सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवून काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी दीर शशिकांत काकडे आणि सासू सुलोचना काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीच्या निधनानंतर उज्वला काकडे या आपल्या १२ ते १३ वर्षांच्या एकुलत्या मुलीसह पांगारे येथे राहत होत्या. मुलीचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, त्याच दिवशी संपत्तीच्या वादातून आईचा जीव गेल्याने आणि वडिलांनंतर आईचेही छत्र हरवल्याने या लहान मुलीवर पोरकेपणाचे दुःख कोसळले आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: हडपसर येथील साधना विद्यालयातील शिक्षिका उज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर) यांची संपत्तीच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली.
Ans: मयत शिक्षिकेचा दीर शशिकांत माणिकराव काकडे आणि सासू सुलोचना माणिकराव काकडे (दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी दिराला काही तासांतच ताब्यात घेतले आहे.
Ans: पतीच्या निधनानंतर खात्यातील ८-१० लाख रुपये आणि सासवडमधील एक गुंठा जागेतील अर्ध्या हिस्स्याच्या वादातून १९ नोव्हेंबर रोजी बस स्टॅन्डकडे पायी जाणाऱ्या उज्वला काकडे यांना कॅरी गाडीने धडक देऊन डोक्यात दगड व मानेवर लोखंडी वस्तूने प्रहार करत ठार मारण्यात आले.






