Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chetan Bhagat : पोरं मोठी झाली! जुळ्या मुलांच्या पदवीप्राप्तीनंतर चेतन भगत भावूक; सोशल मीडियावरील पोस्टची जोरदार चर्चा

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी जुळ्या मुलांच्या पदवीप्राप्तीनिमित्त केलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ईशान भगतने प्रिन्स्टन विद्यापीठातून, तर श्याम भगतने डार्टमाउथ कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 17, 2026 | 07:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी त्यांच्या जुळ्या मुलांच्या पदवीप्राप्तीनिमित्त केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ईशान भगत आणि श्याम भगत यांनी प्रतिष्ठित विद्यापीठांतून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेतन यांनी त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त करत मनातील भावना मांडल्या. नवजात बाळांना पहिल्यांदा हातात घेतल्यापासून ते त्यांना यशस्वी तरुण म्हणून पाहण्यापर्यंतचा प्रवास किती वेगाने झाला, याबद्दल त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले.

Aamir Khan : एकाच कारमध्ये रीना दत्ता, किरण राव आणि गौरी स्प्रॅट; आमिर खानच्या ‘मॉडर्न फॅमिली’ची चर्चा

चेतन भगत यांनी पत्नी अनुषा सूर्यनारायण आणि दोन्ही मुलांसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. ईशानने प्रिन्स्टन विद्यापीठातून, तर श्यामने डार्टमाउथ कॉलेजमधून पदवी मिळवली आहे. दोघांनीही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे सांगत त्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले.

आपल्या पोस्टमध्ये चेतन भगत यांनी लिहिले की, “एका क्षणी डॉक्टर तुमच्या हातात नवजात जुळी बाळं देतात आणि पुढच्या क्षणी तीच मुलं पदवीधर होऊन स्वतःचा मार्ग तयार करताना दिसतात. वेळ कसा निघून जातो हे समजतही नाही.” ते पुढे म्हणाले, “ईशान आणि श्याम यांचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या यशामागे केवळ नशीब नाही, तर सातत्य, मेहनत आणि जिद्दही तितकीच महत्त्वाची आहे.” मुलांच्या स्वभावाबद्दल बोलताना चेतन यांनी नमूद केले की, “स्वतःच्या बळावर पुढे जाण्याची इच्छा, कामाप्रती असलेली निष्ठा आणि नम्रता हे गुण त्यांच्यात आहेत. त्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यातही यश मिळवले आहे.”

त्यांनी पोस्टमध्ये एक हलकाफुलका उल्लेख करत लिहिले की, “जर मी एखाद्या मोठ्या चित्रपटसृष्टीतील कुटुंबात वाढलो असतो, तर कदाचित माझा स्वभाव वेगळा झाला असता. पण माझ्या मुलांनी प्रसिद्धीचा आधार न घेता स्वतःच्या कर्तृत्वावर आपला मार्ग निवडला.” चेतन भगत यांनी आयुष्यातील संघर्षांचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, अनेक चढ-उतार आणि आव्हानांचा सामना करूनही ईशान आणि श्याम यांनी प्रयत्न करणे कधीच सोडले नाही. “तुम्हा दोघांवर माझे मनापासून प्रेम आहे आणि तुमच्या यशाचा मला अपार अभिमान आहे,” असे त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले.

Kartiki Gaikwad : इतक्या मोठ्या शोदरम्यान शाळेत जाणे म्हणजे एक कसरत? कार्तिकीच्या त्या कसरतीवर उजाळा

ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून अनेकांनी ईशान आणि श्याम यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, मुलांच्या यशाबद्दल व्यक्त केलेल्या चेतन भगत यांच्या भावना आणि पालक म्हणून व्यक्त केलेला अभिमान अनेकांच्या मनाला भिडला आहे.

Web Title: Chetan bhagat emotional after twins graduation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Doctor

संबंधित बातम्या

IIT Kanpur MBBS Admission: आयआयटी कानपूर रचणार इतिहास! आता इंजिनिअरिंगच नव्हे तर MBBS चेही शिक्षण देणार
1

IIT Kanpur MBBS Admission: आयआयटी कानपूर रचणार इतिहास! आता इंजिनिअरिंगच नव्हे तर MBBS चेही शिक्षण देणार

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी खूशखबर! भारतीय सशस्त्र दलात ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती; असा करा अर्ज
2

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी खूशखबर! भारतीय सशस्त्र दलात ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती; असा करा अर्ज

NEET SS 2026 ची नोंदणी प्रक्रिया सुरू; १८ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज, ‘या’ तारखेला होणार परीक्षा!
3

NEET SS 2026 ची नोंदणी प्रक्रिया सुरू; १८ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज, ‘या’ तारखेला होणार परीक्षा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.