फोटो सौजन्य - Social Media
कार्तिकी सांगते की, “जेव्हा सारेगमपा सुरु होतं. तेव्हा शाळेचा पाठिंबा असणे फार महत्वाचा होतं. नऊ महिने शो सुरु होता. त्यात आठवडाभर आमची रिहर्सल सुरु असायची. त्या काळात मी फक्त वार्षिक परीक्षेसाठीच शाळेत पाय ठेवले होते.” शाळेचे आभार मानत कार्तिकी म्हणते की “शोच्या सुरुवातीला आम्हाला वाटले होते की शो तीन चार महिन्यांसाठी असेल पण नंतर शोची लोकप्रियता वाढली. शो पुढे नऊ महिन्यांसाठी वाढवण्यात आले. त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या शाळांनी आम्हाला बहुमोलाचा पाठिंबा दिला.”
शो संपल्यानंतर कार्तिकीच्या आयुष्यात आलेले बदल.
जसा सारेगमप संपला तसा कार्तिकीच्या आयुष्यात फार मोठा बदल झाला. तिच्या शाळेत तिला भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी होऊ लागली. काहीकाही तर थेट लांबून तिच्या शाळेत येऊ लागलीत त्यामुळे शाळेत असताना 5 ते 10 मिनिटांसाठी तिला चाहत्यांशी भेटण्यासाठी बाहेर सोडू लागलेत. कार्तिकी म्हणते की तिच्या घरी दररोज शेकडो माणसं तिला भेटण्यासाठी यायची. माऊलींचे दर्शन झाले की भक्तांची पालखी थेट कार्तिकीच्या घराकडे वळत असे.






