Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेठांमधील सुरावटी आता कोथरूड-कर्वेनगरच्या अंगणी! सांस्कृतिक पुण्याचा नवा ‘कळस’

विद्येचे माहेरघर आणि कलेचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या सांस्कृतिक संचिताने आता पेठांच्या भौगोलिक मर्यादा ओलांडून उपनगरांच्या विस्तीर्ण प्रांगणात आपला मांड ठोकला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2026 | 11:30 AM
पेठांमधील सुरावटी आता कोथरूड-कर्वेनगरच्या अंगणी! सांस्कृतिक पुण्याचा नवा 'कळस'

पेठांमधील सुरावटी आता कोथरूड-कर्वेनगरच्या अंगणी! सांस्कृतिक पुण्याचा नवा 'कळस'

Follow Us
Follow Us:

पुणे/पवळे गायत्री : विद्येचे माहेरघर आणि कलेचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या सांस्कृतिक संचिताने आता पेठांच्या भौगोलिक मर्यादा ओलांडून उपनगरांच्या विस्तीर्ण प्रांगणात आपला मांड ठोकला आहे. एकेकाळी शनिवार-नारायण आणि सदाशिव पेठांमधील वाड्यांमधून ऐकू येणारे सप्तसूर आणि घुमणारे नृत्याचे पैंजण आता कोथरूड आणि कर्वेनगरच्या परिसरात अधिक जोमाने निनादू लागले आहेत. मुठेकाठच्या संस्कृतीचे हे नवे ‘बेट’ पुण्याच्या कलावैभवात एका नव्या पर्वाची भर घालत आहे.

 

पानशेतनंतरचे नवचैतन्य आणि सांस्कृतिक स्थलांतर

१९६१ च्या पानशेत प्रलयाने पुण्याचा चेहरामोहरा बदलला आणि पुण्याच्या विस्ताराची नवी क्षितिजे खुली झाली. या कालखंडानंतर कोथरूडचा विकास इतक्या झपाट्याने झाला की, त्याची दखल जागतिक स्तरावर ‘गिनीज बुक’मध्येही घेतली गेली. पेठांमधील गर्दी आणि कोलाहलापासून दूर, निवांतपणा शोधणाऱ्या रसिक पुणेकरांनी कोथरूडमध्ये आपले आशियाने वसविले. मात्र, या रहिवाशांनी आपली ‘सांस्कृतिक भूक’ सोबतच नेली होती. ती भागवण्यासाठी उभे राहिलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ आज कोथरूडच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहे.

रंगदेवतेचा नवा आशियाना

‘बालगंधर्व’नंतर जर कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकांना कोणत्या वास्तूची ओढ वाटत असेल, तर ती म्हणजे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. सुजाण, सुसंस्कृत आणि कलाकृतीचा मर्म जाणणारा प्रेक्षक या नाट्यगृहाचे अविभाज्य अंग झाले आहेत. कलाकारांच्या अभिनयाला येथे मिळणारी उत्स्फूर्त दाद प्रयोगाची उंची अधिक वाढवते, असा प्रत्यय प्रत्येक प्रयोगावेळी येतो.

महोत्सवांची मांदियाळी : अंगण बदलले, पण सूर तेच!

पुण्यातील दिगग्ज संगीत महोत्सवांचे स्वरूप आता बदलले असून, ते विस्तीर्ण आणि भव्य अशा लॉन्समध्ये संपन्न होत आहेत.

स्वर-लयीचा संगम : पंडित फार्म्सचे सुरावटींनी न्हालेले अंगण असो वा महालक्ष्मी लॉन्सची ‘दिवाळी पहाट’; या परिसरातील हवेतच जणू संगीताचा दरवळ जाणवतो.

परंपरेचा वारसा : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानाचा ‘वसंतोत्सव’ आता वारजे येथील काकडे फार्म्सच्या प्रांगणात बहरत आहे, तर ‘स्वरझंकार’ सारख्या महोत्सवांनी एमआयटी परिसराला चैतन्य मिळवून दिले आहे.

सधन रसिकता आणि कलेची जोपासना

कोथरूड-कर्वेनगर भागातील रसिक केवळ रसिकच नाहीत, तर ते कलेसाठी योगदान देणारे ‘राजाश्रय’ देणारे प्रेक्षक आहेत. सांस्कृतिक उपक्रमांसाठी आर्थिक पाठबळ देण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती या परिसरातील नागरिकांमध्ये दांडगी आहे. याच पाठबळामुळे आयोजकांचा हुरूप वाढत असून, पुण्याच्या सांस्कृतिक नकाशावर कोथरूड-कर्वेनगर हे एक दैदीप्यमान नक्षत्र म्हणून चमकत आहे.

केवळ पश्चिमेकडेच नव्हे, तर सहकारनगर आणि बिबवेवाडी भागातील नागरिकांसाठी ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह’ ही वास्तू देखील कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे. थोडक्यात सांगायचे तर, पुण्याची संस्कृती आता पेठांच्या चौकटीतून मुक्त होऊन उपनगरांच्या मोकळ्या आकाशात कवेत घेता येईल इतकी बहरली आहे.

सदाशिव पेठेतून सुरवातीला आलेला विकास आपल्याला कोथरूड मध्ये पहायला मिळाला. तसंच हळू हळू बिबेवाडी, धनकवडी , कात्रज सारख्या ठिकाणीही विकास होताना दिसून येतो.जेवढा शिक्षित कलाप्रेमी वर्ग तेवढा विकसित झालेला भाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि कदाचित हळूहळू या कलेची विकासिकता वाढताना दिसून येत आहे. – निकिता कराळे (कथ्थक नृत्यांगना)

Web Title: Cultural programs are being held in the kothrud and karvenagar areas of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Cultural Event
  • Kothrud
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.