घरी लक्ष्मी आली! दीपिका पादुकोण-रणवीर सिंह पुन्हा झाले आई-बाबा
Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी पुन्हा एकदा मुलीचे आगमन झाले आहे. या स्टार कपलने एप्रिल 2026 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्या प्रेग्नन्सीची अधिकृत माहिती दिली होती. यावेळी त्यांची मुलगी दुआही सहभागी होती.
18 सप्टेंबर रोजी दीपिका आणि रणवीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते.यावेळी रणवीरचे आई-वडीलही त्यांच्यासोबत होते. दुसऱ्या बाळाच्या आगमनापूर्वी या जोडप्याने गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये दुआच्या जन्मापूर्वीही दीपिका आणि रणवीर यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.
दीपिका आणि रणवीरची पहिली मुलगी दुआचा जन्म 8 सप्टेंबर 2024 रोजी झाला. यंदा तिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त या जोडप्याने खास फॅमिली फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दीपिकाचा बेबी बम्पही दिसत होता. त्यामुळे आता दुआ मोठी बहीण झाली आहे.
दीपिका आणि रणवीर यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे विवाह केला होता. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी दुआचे स्वागत केले आणि एप्रिल 2026 मध्ये दुसऱ्या बाळाची चाहूल चाहत्यांसोबत शेअर केली.
बातमी अपडेट होत आहे..






