Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Don’t Be Shy : मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास…आलिया आणि शाहीन भट्टचा ‘डोंट बी शाय’ चित्रपट, ‘या’ तारखेला ग्लोबल प्रीमियर

Don't Be Shy : अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्या 'इंटरनल सनशाइन प्रोडक्शन्स'ची निर्मिती असलेला 'डोंट बी शाय' हा बहुप्रतिक्षित चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 06:59 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास…
  • आलिया आणि शाहीन भट्टचा ‘डोंट बी शाय’ चित्रपट
  • ‘या’ तारखेला ग्लोबल प्रीमियर
Don’t Be Shy :  श्रीति मुखर्जी यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांनी त्यांच्या इंटरनल सनशाइन प्रोडक्शन्स या बॅनरखाली केली आहे, तर ग्रिश्मा शाह आणि विकेश भूटानी हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. यंग-अडल्ट रोमँटिक कॉमेडीमध्ये चार नवोदित चेहरे—आरुषि बजाज, अंश दुग्गल, बियांका अरोरा आणि पीयूष खाटी—प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ( Don’t Be Shy ) 

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

ही कमिंग-ऑफ-एज रोमँटिक कॉमेडी चार नवोदित कलाकारांच्या आयुष्याभोवती फिरते. मैत्री, पहिलं प्रेम, हृदयभंग, स्वप्नं आणि तरुण वयात स्वतःला व आयुष्याला समजून घेण्याच्या गुंतागुंतीच्या प्रवासाची ही कथा आहे. चित्रपटात कुणाल रॉय कपूर, अनुराग बसु, नेहा धूपिया आणि अंजू अल्वा नाईक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

अप्रतिम नव्या कलाकारांची ओळख

प्राइम व्हिडिओ आणि अमेझॉन MGM स्टुडिओज इंडियाच्या ओरिजिनल्स विभागाचे डायरेक्टर आणि हेड निखिल माधोक म्हणाले, “डोंट बी शाय हा आमच्या सर्वात खास चित्रपटांपैकी एक आहे आणि अखेर त्याच्या ग्लोबल स्ट्रीमिंग प्रीमियरची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटातून आरुषि, अंश, बियांका आणि पीयूष या चार अप्रतिम नव्या कलाकारांची ओळख प्रेक्षकांना होणार आहे. ते आपल्या व्यक्तिरेखांमध्ये ताजेपणा आणि प्रामाणिकपणा घेऊन आले आहेत. श्रीति मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात आणि आलिया व शाहीन भट्ट यांच्या क्रिएटिव्ह दृष्टिकोनातून साकारलेला ‘डोंट बी शाय’ हा मैत्री, प्रेम आणि मोठं होण्याच्या सुंदर पण गुंतागुंतीच्या प्रवासाचा मनापासून साजरा करणारा चित्रपट आहे. प्रेक्षकांनी ‘शाय’च्या जगात पूर्णपणे रमावं, अशी आमची इच्छा आहे.”

काय आहे स्टोरीलाईन ?

आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट, इंटरनल सनशाइन प्रोडक्शन्सच्या सह-संस्थापकांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले, “डोंट बी शाय सुरुवातीपासूनच आमच्यासाठी अत्यंत खास राहिला आहे आणि हा चित्रपट अशा प्रकारे आकार घेताना पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो. हा चित्रपट तरुणपणातील त्या टप्प्याची खरी भावना मांडतो—तुम्हाला बदलून टाकणाऱ्या मैत्री, आयुष्यावर कायमचा ठसा उमटवणारं पहिलं प्रेम, दीर्घकाळ आठवत राहणारा हृदयभंग आणि हळूहळू आपण खरोखर कोण आहोत, हे समजून घेण्याचा प्रयत्न.

या अप्रतिम यंग कास्टबद्दल आम्हाला सर्वाधिक उत्साह आहे. त्यांची ऊर्जा, संवेदनशीलता आणि एकमेकांमधील केमिस्ट्री खरोखरच खास आहे आणि त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांना जिवंत केलं आहे. भारतासह जगभरातील प्रेक्षकांनी ‘शाय’ची भेट घ्यावी आणि त्याच्या सुंदर, थोड्याशा गुंतागुंतीच्या जगाचा भाग व्हावं, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

या तारखेला प्रीमियर

प्राइम व्हिडिओ, भारतातील सर्वात मोठ्या एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्स स्ट्रीमिंग सेवांपैकी एक, ने आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल चित्रपट ‘डोंट बी शाय’ च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची तारीख २५ सप्टेंबर जाहीर केली आहे. भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह स्ट्रीम केला जाईल.

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद

Web Title: Dont be shy movie starring newcomers release date announced marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • Amazon Prime
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट
1

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

Tumbbad 2: ‘तुम्बाड’च्या आठवणी पुन्हा ताज्या! रेकीदरम्यान सापडले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे
2

Tumbbad 2: ‘तुम्बाड’च्या आठवणी पुन्हा ताज्या! रेकीदरम्यान सापडले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.