Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?

Drishyam 3 पाहणाऱ्या चाहत्यांसाठी खास ऑफर! PVR INOXवर ४ किंवा अधिक तिकिटे बुक करा आणि पहिल्या ५०० पात्र ग्राहकांमध्ये असल्यास फ्री पावभाजी कूपन मिळवा.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2026 | 08:41 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फ्री पावभाजीसाठी काय करावं लागणार?
  • कुठल्या शहरांमध्ये मिळणार फ्री पावभाजी?
  • पावभाजीचा ‘दृश्यम’च्या कथेशी काय संबंध?
Drishyam 3: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘Drishyam: The Conclusion’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याआधीच चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. दरम्यान, ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या चाहत्यांसाठी एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट पाहतानाच तुम्हाला प्रसिद्ध पावभाजीचा आस्वाद घेता येणार आहे, तोही चक्क मोफत! मात्र, या ऑफरसाठी काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

‘दृश्यम 3’ पाहा आणि फ्री पावभाजी मिळवा

‘दृश्यम’चे आधीचे भाग पाहिले असतील तर चित्रपटातील प्रसिद्ध पावभाजीचा संदर्भ नक्कीच आठवत असेल. विजय साळगावकरच्या २ ऑक्टोबरच्या कथेत पावभाजीचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. आता याच पावभाजीला ‘Drishyam: The Conclusion’च्या प्रमोशनशी जोडण्यात आलं आहे.

२ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहणाऱ्या निवडक प्रेक्षकांना मोफत पावभाजी देण्यात येणार आहे. मात्र, एका व्यक्तीने केवळ एक तिकीट बुक करून या ऑफरचा लाभ घेता येणार नाही.

फ्री पावभाजीसाठी काय करावं लागणार?

या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर ‘Drishyam: The Conclusion’ची किमान चार तिकिटे एकाच व्यवहारात बुक करावी लागतील. ही बुकिंग PVR INOXच्या अॅप किंवा वेबसाइटवरून करणे आवश्यक आहे.

या पद्धतीने चार किंवा त्याहून अधिक तिकिटे बुक करणाऱ्या पहिल्या ५०० पात्र ग्राहकांना मोफत पावभाजीचं कूपन मिळणार आहे. त्यामुळे चार तिकिटे वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये बुक केली तर ही ऑफर लागू होणार नाही.

कुठे मिळणार फ्री पावभाजी?

ही ऑफर सर्व PVR INOX चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध नाही. २ ऑक्टोबर रोजी मुंबई, दिल्ली-NCR आणि गुरुग्राममधील निवडक PVR INOX सिनेमागृहांमध्ये या कूपनचा वापर करता येणार आहे. त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी संबंधित थिएटरमध्ये ही ऑफर लागू आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

‘दृश्यम’ आणि पावभाजीचं कनेक्शन काय?

‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी पावभाजी हा केवळ खाद्यपदार्थ नाही, तर चित्रपटाच्या कथानकातील एक महत्त्वाचा संदर्भ आहे. पहिल्या ‘दृश्यम’मध्ये अजय देवगणने साकारलेला विजय साळगावकर आपल्या कुटुंबासोबत २ ऑक्टोबरला पणजीमध्ये असल्याची कथा तयार करतो.

विजय आणि त्याचं कुटुंब २ ऑक्टोबरला स्वामी चिन्मयानंदांच्या सत्संगाला गेले होते, त्यानंतर त्यांनी पावभाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी परतले, असं सांगितलं जातं. हे छोटे-छोटे तपशील विजयच्या कथित अलिबीचा महत्त्वाचा भाग बनतात.

पडद्यावरची पावभाजी आता प्रेक्षकांच्या प्लेटमध्ये

‘दृश्यम’मधील पावभाजीचा हा प्रसिद्ध संदर्भ आता चित्रपटाच्या प्रमोशनल ऑफरमधून प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या अनुभवाचा भाग बनणार आहे. म्हणजेच, विजय साळगावकरच्या ‘२ ऑक्टोबर’च्या कथेतील पावभाजी आता तुम्हालाही चाखता येणार आहे.

फक्त लक्षात ठेवा—किमान ४ तिकिटे एकाच व्यवहारात, PVR INOXच्या अॅप किंवा वेबसाइटवरून बुक करायची आणि पहिल्या ५०० पात्र ग्राहकांमध्ये तुमचा नंबर लागला तरच ही ऑफर मिळणार आहे.

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Web Title: Drishyam 3 free pav bhaji offer inox 4 tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • Ajay Devgn
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
1

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
2

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो
3

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video
4

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.