Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्यानंतर बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटांतील कलाकार कोण?

  • By अमृता यादव
Updated On: Oct 19, 2026 | 03:47 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tiger Shroff Firing Case:  बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ माजली आहे. काल १८ ऑक्टोबर रोजी अभिनेत्यावर मुंबईतील जुहू येथे हल्लाकरण्यात आला या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला आहे. हल्लाच्या घटनेनंतर, र, लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. या ऑडिओमध्ये सलमान खानसोबत काम करणाऱ्या कोणालाही ठार मारण्याची स्पष्ट धमकी देण्यात आली आहे. बिश्नोई टोळीने यापूर्वीही सलमान खानच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. सलमान खान सोबत सध्या कोणते कलाकार काम करत आहेत आणि कोणाला धोका निर्माण होऊ शकतो असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सलमान खानसोबत काम करणारे कलाकार चर्चेत

या कथित धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानसोबत आगामी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी चर्चा सुरू झाली आहे. सलमान सध्या ‘मातृभूमी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री चित्रांगदा सिंहसोबत दिसणार आहे. चित्रपटातील दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

अपूर्व लाखिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचं मूळ नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ होतं, मात्र नंतर त्याचं नाव बदलून ‘मातृभूमी’ ठेवण्यात आल्याचं वृत्त आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि नियोजित वेळापत्रक याबाबत अधिकृत माहिती तपासणं आवश्यक आहे.

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; महाराष्ट्रात वाढली चर्चा, आता अमेरिकेतही होणार प्रदर्शित

सलमान खानच्या ‘मॉन्स्टर’चीही चर्चा

सलमान खानच्या आणखी एका आगामी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं नाव ‘मॉन्स्टर’ असल्याचं सांगितलं जात असलं, तरी निर्मात्यांकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त आहे. वामशी पैडीपल्ली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ए. पी. ढिल्लन, कपिल शर्मा, रोहित शेट्टी आणि गुरू रंधावा यांसारख्या मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींशी संबंधित ठिकाणी यापूर्वी हल्ले किंवा धमक्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत.बिश्नोई गँगने प्रत्येक हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, एका निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, सलमान खानसोबत काम करणाऱ्यांवर असे हल्ले सुरूच राहतील. आता या यादीत टायगर श्रॉफचाही समावेश झाला आहे. या खळबळजनक हल्ल्यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!

Web Title: Tiger shroff firing case salman khan co stars security ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • entertainment
  • Salman Khan
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!
1

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व
2

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!
3

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आरोपींचा होता आणखी मोठा कट? पुढचं टार्गेट कोण होतं? राजस्थान पोलिसांचा खळबळजनक खुलासा!

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!
4

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.