Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व

Chikeezing Marathi Movie: ‘चिकीझिंग’ या आगामी मराठी चित्रपटाचं ‘झिंग चिकी चिकी झिंग’ हे शीर्षकगीत रिलीज झालं आहे. बालपणाचा गोडवा जपणारा हा चित्रपट १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 19, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Chikeezing Marathi Movie:  बालपणीच्या निरागस आठवणी, मातीचा सुगंध, भावंडांमधील निखळ प्रेम आणि ग्रामीण जीवनातील गोडवा… या सगळ्यांचा सुरेल अनुभव देणारं ‘चिकीझिंग’ या आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षकगीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. व्हिडीओ पॅलेसच्या सहकार्याने प्रदर्शित झालेलं ‘झिंग चिकी चिकी झिंग’ हे गाणं आपल्या खेळकर शब्दरचनेने, ठेका धरायला लावणाऱ्या संगीताने आणि ग्रामीण जीवनाच्या लोभस चित्रणाने लक्ष वेधून घेत आहे. बालपणाचा गोडवा आणि नात्यांमधील ऊब जपणारा हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘झिंग चिकी चिकी झिंग’ गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व

‘चिकीझिंग’च्या शीर्षकगीताला गौरी जोशी आणि पद्मनाभ गायकवाड यांचा आवाज लाभला आहे. वैभव कुलकर्णी यांच्या खट्याळ शब्दांना श्रीनिधी व्यंकट यांनी सुरेल चालीत गुंफलं आहे. कृष्णराज वाईंगडे आणि सहकलाकारांवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन स्नेहा पाटील आणि सेजल कोरे यांनी केलं आहे.

मुलांचं कल्पनाविश्व, त्यांच्या निरागस खोड्या आणि छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधण्याची वृत्ती या गाण्यातून सुंदरपणे उलगडते. लाल मातीचे रस्ते, हिरवीगार शेते, कौलारू घरांच्या ओवऱ्या, शाळेतील धमाल आणि वाहत्या पाण्याचे प्रवाह यांमुळे ग्रामीण जीवनाचं देखणं चित्र प्रेक्षकांसमोर उभं राहतं. बालकलाकारांच्या निरागस हालचाली आणि बहीण-भावाच्या नात्यातील माया गाण्याला भावनिक स्पर्श देतात. त्यामुळे हे शीर्षकगीत केवळ श्रवणीयच नाही, तर बालपणीच्या आठवणींमध्ये रमवणारा दृक्-अनुभवही ठरतं.

Tiger Shroff: टायगरवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावला ‘बिग बॉस’ विजेता; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव

ग्रामीण बालपण आणि कौटुंबिक नात्यांची गोष्ट

‘चिकीझिंग’ हा चित्रपट ग्रामीण भागातील बालपण, शाळेतील गंमतजंमत, भावंडांमधील जिव्हाळा आणि कौटुंबिक नात्यांचं भावविश्व उलगडणार आहे. बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटातून अशा प्रकारचं बालगीत समोर आल्याने या गाण्याने रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र बगाटे व वैभव कुलकर्णी यांनी केलं आहे.

Mumbai: विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद पेटला; नाना पाटेकर की स्मित मच्छार? नावाच्या मागणीवरून संघर्ष

कलाकार आणि तांत्रिक टीमही महत्त्वाची

या चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांच्या भूमिका आहेत. प्रवीण सोनावणे यांनी छायांकनाची, तर शेखर गुरव आणि एस. शंकर यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. श्रीनिधी व्यंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी संगीत दिलं असून सुरेश कुंभार यांनी कला दिग्दर्शन आणि वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे.

बालपणीच्या आठवणी, ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि नात्यांमधील प्रेम यांची अनुभूती देणारा ‘चिकीझिंग’ हा मराठी चित्रपट १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातून प्रेक्षकांना बालपणीच्या रम्य विश्वाची पुन्हा एकदा सफर घडणार का, याची उत्सुकता आहे.

Web Title: Chikeezing marathi movie title song release ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; महाराष्ट्रात वाढली चर्चा, आता अमेरिकेतही होणार प्रदर्शित
1

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; महाराष्ट्रात वाढली चर्चा, आता अमेरिकेतही होणार प्रदर्शित

Mumbai: विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद पेटला; नाना पाटेकर की स्मित मच्छार? नावाच्या मागणीवरून संघर्ष
2

Mumbai: विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद पेटला; नाना पाटेकर की स्मित मच्छार? नावाच्या मागणीवरून संघर्ष

Tiger Shroff: टायगरवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावला ‘बिग बॉस’ विजेता; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव
3

Tiger Shroff: टायगरवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावला ‘बिग बॉस’ विजेता; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट
4

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.