Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eetha Movie Postponed: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची रिलीज डेट बदलली; यशसोबतचा क्लॅश टळला, आता प्रभास-अक्षयसमोर आव्हान!

Eetha Movie Postponed: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. यशच्या ‘टॉक्सिक’सोबतचा क्लॅश टळला असून, आता प्रभास आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांशी टक्कर होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 12, 2026 | 10:16 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Eetha Movie Postponed: श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या महान लावणी आणि तमाशा लोककलाकार विठ्ठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी ‘ईठा’ची रिलीज डेट पुढे ढकलली असून, आता हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

यशसोबत होणारी टक्कर टळली

‘ईठा’ यापूर्वी २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. त्याच काळात यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी रिलीज होणार असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार होती. मात्र, ‘ईठा’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने श्रद्धा कपूर आणि यश यांच्यातील हा क्लॅश आता टळला आहे.

मॅडॉक फिल्म्सने केली नवीन रिलीज डेटची घोषणा

चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मॅडॉक फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘ईठा’च्या नव्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. “वादळासाठी तयार व्हा… कारण #EETHA येत आहे, ४ डिसेंबरला!” अशा कॅप्शनसह ही घोषणा करण्यात आली.

मात्र, यशसोबतची टक्कर टळली असली तरी श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’समोर आता आणखी मोठे आव्हान असणार आहे. कारण ४ डिसेंबर रोजी प्रभास आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांशी ‘ईठा’ची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

प्रभास-अक्षयच्या चित्रपटांशी होणार सामना?

नव्या रिलीज डेटनुसार श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच काळात प्रभासचा पॅन-इंडिया चित्रपट ‘फौजी ३’ रिलीज होण्याची शक्यता आहे. तसेच अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका असलेला अनीस बाझमी यांचा आगामी चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर तीन मोठ्या चित्रपटांमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळू शकते. मात्र, डिसेंबरला अजून काही महिने बाकी असल्याने यापैकी कोणता चित्रपट ठरलेल्या तारखेला रिलीज होतो आणि कोणाच्या प्रदर्शनाची तारीख बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘Spider-man: Brand New Day’ मध्ये BMW ची एन्ट्री! ‘BMW iX3 Neue Klasse’ इलेक्ट्रिक कारनं जिंकली प्रेक्षकांची मनं

टीझरला मिळाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद

‘ईठा’चा टीझर सर्वप्रथम ‘कॉकटेल २’ या चित्रपटासोबत थिएटरमध्ये दाखवण्यात आला होता. त्यानंतर हा टीझर ऑनलाइन प्रदर्शित करण्यात आला. टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून श्रद्धा कपूरच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली.

अनेक प्रेक्षकांनी श्रद्धा या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय सादर करू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. काही चाहत्यांनी तर तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराचीही शक्यता व्यक्त केली आहे.

‘छावा’नंतर लक्ष्मण उतेकर यांचा नवा चित्रपट

‘ईठा’चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. त्यांच्या मागील ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत ब्लॉकबस्टर यश मिळवले होते. त्यामुळे ‘ईठा’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. आता श्रद्धा कपूर विठ्ठाबाई नारायणगावकर यांची भूमिका किती प्रभावीपणे साकारते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Web Title: Eetha movie postponed shraddha kapoor release date changed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण
1

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
2

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी
3

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
4

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.