Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eetha Movie: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’मध्ये विठाबाईंच्या नवऱ्याची भूमिका साकारणार ‘हा’ बॉलिवूड अभिनेता, ‘मर्चंट’चा फर्स्ट लूक समोर

Eetha Movie: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटात रणदीप हुड्डा ‘मर्चंट’ची भूमिका साकारणार आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या पतीच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लूक समोर आला असून चित्रपट ४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 30, 2026 | 11:13 AM
( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Eetha Movie: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात आता बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याची एन्ट्री झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्चआधी रणदीपचा फर्स्ट लूक शेअर करत प्रेक्षकांना खास सरप्राईज दिलं आहे. या चित्रपटात तो ‘मर्चंट’ नावाची भूमिका साकारणार असून, हे पात्र विठाबाईंचे पती असल्याचे सांगितले जात आहे.

‘मर्चंट’च्या भूमिकेतील रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक

शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्लाझा सिनेमा येथे आयोजित प्रमोशनल इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर रणदीप हुड्डाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. रणदीपनेही हे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. त्याच्या या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रणदीपने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमधून ‘मर्चंट’ या पात्राची ओळख करून दिली. चित्रपटाच्या कथेत या व्यक्तिरेखेचे महत्त्व अधोरेखित करत त्याने चाहत्यांना आगामी ट्रेलरची आठवणही करून दिली. पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्समधून उत्सुकता व्यक्त केली आहे.

पहिल्यांदाच लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात झळकणार रणदीप

‘ईठा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. रणदीप हुड्डा पहिल्यांदाच त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना दिसणार आहे. श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. सिद्धार्थ जाधव, शुभंकर एकबोटे आणि राधा सागर यांचाही चित्रपटात समावेश आहे.

 

Vandana Gupte: ‘….आणि त्यात काहीच चुकीचं नाही’ ‘आमने सामने’ नाटकावरून मोठा वाद, वंदना गुप्ते यांनी मांडली रोखठोक भूमिका

४ डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विठाबाईंच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या प्रवासाची झलक या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. रणदीप हुड्डाच्या ‘मर्चंट’ या भूमिकेमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रणदीपच्या लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने त्याच्या आधीच्या ‘किक’ आणि ‘हायवे’ चित्रपटांतील भूमिकांचा उल्लेख करत या नव्या व्यक्तिरेखेत त्याला पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले. तर दुसऱ्या चाहत्याने ‘केमिस्ट्री एकदम जबरदस्त दिसतेय’ अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी या खुलाशाला मोठं सरप्राईज म्हटलं आहे.

आता ‘ईठा’च्या ट्रेलरमध्ये रणदीप हुड्डाची ‘मर्चंट’ ही व्यक्तिरेखा कशी उलगडते आणि श्रद्धा कपूरसोबत त्याची केमिस्ट्री कशी दिसते, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी आणि समर आई-बाबा होणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट; पाहा नवा प्रोमो!

Web Title: Eetha movie randeep hooda entry merchant first look shraddha kapoor cinema ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • entertainment
  • Randeep Hooda
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Aamir Khan -Gauri Karwa Chauth: वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानचं पहिलं करवा चौथ! तिसऱ्या लग्नानंतर गौरीसोबत केलं खास सेलिब्रेशन
1

Aamir Khan -Gauri Karwa Chauth: वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानचं पहिलं करवा चौथ! तिसऱ्या लग्नानंतर गौरीसोबत केलं खास सेलिब्रेशन

Janhvi Kapoor: जाह्नवी कपूर होणार महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याची सून? लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा
2

Janhvi Kapoor: जाह्नवी कपूर होणार महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय घराण्याची सून? लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने केला खुलासा

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी आणि समर आई-बाबा होणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट; पाहा नवा प्रोमो!
3

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी आणि समर आई-बाबा होणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट; पाहा नवा प्रोमो!

Scam 1992: IMDb च्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत ‘स्कॅम १९९२’ अव्वल; ‘क्रिमिनल जस्टिस’चाही समावेश
4

Scam 1992: IMDb च्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत ‘स्कॅम १९९२’ अव्वल; ‘क्रिमिनल जस्टिस’चाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.