आमिर खानचं गौरी स्प्रॅटसोबत पहिलं करवा चौथ ( फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
61 व्या वर्षी आमिर खानने तिसरं लग्न केल्यानंतर पत्नी गौरी स्प्रॅटसोबत पहिल्यांदाच करवा चौथ साजरा केला आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी करवा चौथच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या सेलिब्रेशनला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्द कलाकार आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.
याच कार्यक्रमासाठी अभिनेता आमिर खानने आणि त्याची पत्नी गौरी स्प्रॅटने अनिल कपूर यांच्या घराबाहेर, पापाराझींसमोर एकत्र फोटोसाठी पोझ दिल्या. यावेळी आमिर गौरीचा हात धरून तिची काळजी घेताना दिसला. या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते भारावून गेले.
करवा चौथच्या सेलब्रेशनसाठी आमिर खानने अतिशय साधा लूक निवडला होता. त्याने प्रिंटेड शॉर्ट कुर्ता आणि ब्लॅक हरेम पँट परिधान केली होती. विशेष म्हणजे, या लूकसोबत त्याने पायात साध्या चप्पल घातल्या होत्या.
तर दुसरीकडे पत्नी गौरीने सुंदर जांभळ्या रंगाचा बनारसी शरारा सूट परिधान केला होता. सटल मेकअप आणि साध्या लूकमध्ये गौरी खूप सुंदर दिसत होती.