Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झी नाट्यगौरव २०२६: नाट्यगौरव आणि जीवनगौरव पुरस्कारांचा उत्साही संगम, सई परांजपे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

‘झी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’. यंदा हा सोहळा खूप उत्साहात पार पडला. या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना देण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 22, 2026 | 12:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी नाट्यसृष्टीचा मोठा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे ‘झी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’. यंदा हा सोहळा खूप उत्साहात पार पडला. यावेळी सोहळ्याची थीम होती मराठी नाटकांचा दौरा, ज्यात नाटकांच्या गमती-जमती, किस्से आणि अनुभव सुंदरपणे मांडले गेले.या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना देण्यात आला. २२ मार्चपासून मराठी नाटकांचा दिमाखदार दौरा सुरू होणार आहे.

लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे यांचा गोष्ट रचण्याचा प्रवास खूपच खास आहे. लहानपणी आई त्यांना झोपवताना गोष्टी सांगायची. पण एकदा आईला कंटाळा आल्यावर तिने सईला म्हणाले, “आज तूच गोष्ट सांग बरं.” त्या दिवशी सईने आईला इतकी छान गोष्ट सांगितली की आईची झोपच उडाली. त्यापासूनच तिचा गोष्ट लिहिण्याचा प्रवास सुरू झाला.सईंच्या आई लेखिका आणि वडील चित्रकार असल्यामुळे घरात नैसर्गिक रंगभाषा आणि कथा सांगण्याची सवय होती. आईने सईला केवळ झोपण्यापूर्वीच्या गोष्टीपुरत्या न ठेवता, रोज दोन पानं लिहिण्याची सवय लावली.अवघ्या आठ वर्षांच्या वयातच सई परांजपे यांनी आपले पहिले पुस्तक ‘मुलांचा मेवा’ प्रकाशित केले. हे पुस्तक त्यांच्या प्रतिभेची पहिली ठळक नोंद ठरली.

“मुलं लहान वयापासून सुंदर लिखाण करू शकतात, पण दुर्दैव असं की त्यांना शकुंतला परांजपे नावाची आई लाभत नाही,” हे तुमचं वाक्य तुमच्या कलाजीवनात आईचं स्थान किती मोठं आहे हे अधोरेखित करतं.

आई शकुंतला परांजपे आणि आजोबा रॅंगलर परांजपे यांच्या देखरेखीखाली पुण्यात काटेकोर शिस्तीत झालेली तुमची जडणघडण, पुढे तुमच्या बहुआयामी कारकिर्दीचा भक्कम पाया ठरली. कॉलेजमध्ये असताना आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘निवेदिका’ म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला. ‘बालोद्यान’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही अनेक बालनाटके लिहिली, बसवली आणि सादर केली. याच प्रयत्नांतून बालरंगभूमीची कल्पना प्रत्यक्षात उतरली. ‘पत्तेनगरी’ पासून सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘शेपटीचा शाप’, ‘जादूचा शंख’, ‘झाली काय गंमत’, ‘भटक्यांचे भविष्य’, ‘हरवलेल्या खेळण्यांचे राज्य’, ‘पक्ष्यांचं कविसंमेलन’, ‘देवाची फुलं’, ‘सळो की पळो’, ‘माझा खेळ मांडू दे’ अशा अनेक अविस्मरणीय नाटकांपर्यंत विस्तारला.

‘पत्तेनगरी’च्या प्रयोगाला भारताचे तत्कालीन मंत्री श्री. बाळकृष्ण केशकर प्रमुख पाहुणे होते. बालरंगभूमीचा बोलबाला इतका वाढला की एकदा तर यशवंतराव चव्हाण आणि खुद्द पंडित नेहरूही नाटकाला आले होते. पुढे तुम्ही ‘एक तमाशा अच्छा खासा’, ‘गीध’, ‘धिक् ताम्’, ‘पुन्हा शेजारी’, ‘जास्वंदी/पंजे’, ‘आलबेल’, ‘सख्खे शेजारी’, ‘बिकट वाट वहिवाट’ अशी अनेक नाटके यशस्वीरित्या रंगमंचावर आणलीत. लग्नानंतर तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथे नाटक शिकायला गेलात. पुढे शिष्यवृत्ती मिळवून तुम्ही पॅरिसच्या रंगभूमीवरून अनेक गोष्टी शिकून आलात. रंगभूमीव्यतिरिक्त चित्रपट, साहित्य, दूरदर्शन, रेडिओ, माहितीपट — ह्या सगळ्या विश्वांमधलं तुमचं योगदान आणि कारकीर्द अत्यंत महत्त्वाची आणि अभूतपूर्व आहे.

‘Dhurandhar 2 ’चा साऊथमध्येही जलवा! एस. एस. राजामौली यांनी दिला रिव्ह्यू; रणवीर सिंगच्या अभिनयाचं केलं कौतुक

नसीरुद्दीन शहा, फारुख शेख, दीप्ती नवल, शबाना आझमी, नाना पाटेकर, ओम पुरी, रघुवीर यादव, निळू फुले अशा अनेक दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन, तुमच्या दिग्दर्शनाखाली हिंदी सिनेमाला एक नवा, संवेदनशील आणि आशयघन अध्याय लाभला. तबलावादक झाकीर हुसैन यांच्या वादनाने डोळे मिटून मंत्रमुग्ध होणारे आम्ही सगळेचं आहोत, पण डोळे उघडून त्यांच्यात सिनेमातला नायक पाहू शकला ते तुम्हीच. पद्मभूषण ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असे कितीतरी सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला लाभले, पण त्याहीपेक्षा रसिकांच्या मनातलं तुमचं ‘अढळ’स्थान अधिक उंच आहे. गल्लाभरू कामापेक्षा तुमची नाटके आणि सिनेमे हे ‘कलात्मक’ आणि ‘करमणूकप्रधान’ अधिक होते, आणि म्हणूनच ते आजही महत्त्वाचे ठरतात.

BO Collection: Dhurandhar 2 चा ईदला धमाका! रणवीर सिंगच्या चित्रपटाची 300 कोटी क्लबमध्ये दमदार एन्ट्री

लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे यांची कथा आणि नाट्यसृष्टीतली शैली अत्यंत खास आहे. त्यांच्या तिरकस शैलीतून माणसांच्या आयुष्याची गूढता आणि साधेपणा दोन्ही अनुभवायला मिळतात. ‘खिडकीतल्या मांजराला’ वाचताना असं वाटतं की त्या मांजराला खरंच जगातले किती रंग, भीती, आनंद दिसत असतील.

सईंच्या निखळ हसण्याने आणि मांजरागत काचडोळ्यांमधून माणसांशी आपलेपण जुळते, भीतीही सोबत वाटते. अनेक क्षेत्रांत पसरलेल्या त्यांच्या सर्जनशीलतेचे हे ‘इवलंस रोप’ अनेक फांद्यांनी भरलेले आहे.सईबाई, तुम्ही खरंच कधीही न कोसळणारी आणि भव्य ‘पत्तेनगरी’ रचली आहे. त्यांच्या प्रदीर्घ, बहुआयामी आणि देदीप्यमान नाट्यकारकीर्दीला झी नाट्यगौरवकडून मानाचा मुजरा देण्यात आला आहे.

Web Title: Enthusiastic celebration of natya gaurav and jeevan gaurav award sai paranjpye announced for jeevan gaurav award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • awarded
  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Swarda Thigale: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेच्या घरी चिमुकल्या लेकीचं आगमन; Daughters Day च्या दिवशी सांगितली गोड बातमी
1

Swarda Thigale: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम स्वरदा ठिगळेच्या घरी चिमुकल्या लेकीचं आगमन; Daughters Day च्या दिवशी सांगितली गोड बातमी

India’s Best Dancer 5 Winner: १९ वर्षीय रितेश पालने मारली बाजी; प्रतीक उतेकरसोबत जिंकली ट्रॉफी, १५ लाखांचं बक्षीस
2

India’s Best Dancer 5 Winner: १९ वर्षीय रितेश पालने मारली बाजी; प्रतीक उतेकरसोबत जिंकली ट्रॉफी, १५ लाखांचं बक्षीस

SS Rajamouli: एस. एस. राजामौलींच्या सिनेसृष्टीतील २५ वर्षांचा प्रवास; ‘वाराणसी’सह पुन्हा भव्य सिनेमाची तयारी
3

SS Rajamouli: एस. एस. राजामौलींच्या सिनेसृष्टीतील २५ वर्षांचा प्रवास; ‘वाराणसी’सह पुन्हा भव्य सिनेमाची तयारी

Ranbir Kapoor: फोटोग्राफरच्या बोलण्यावर का संतापला रणबीर कपूर? आलिया-विक्कीसोबत पोज देताना नेमकं काय घडलं?
4

Ranbir Kapoor: फोटोग्राफरच्या बोलण्यावर का संतापला रणबीर कपूर? आलिया-विक्कीसोबत पोज देताना नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.