Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranbir Kapoor: फोटोग्राफरच्या बोलण्यावर का संतापला रणबीर कपूर? आलिया-विक्कीसोबत पोज देताना नेमकं काय घडलं?

Ranbir Kapoor: आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत पोज देताना रणबीर कपूर फोटोग्राफरवर संतापला. ‘बहुत बोल रहा है तू’ म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 27, 2026 | 03:35 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा आगामी ‘रामायण’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. त्याचबरोबर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या टीमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामध्ये रणबीर कपूर एका फोटोग्राफरवर नाराज होताना दिसत आहे.

आलिया, विक्की आणि भन्साळींसोबत दिसला रणबीर

२६ सप्टेंबरच्या रात्री रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मुंबईत एकत्र दिसले. चौघांनीही फोटोग्राफर्ससमोर काही वेळ पोज दिल्या. यावेळी रणबीरने संजय लीला भन्साळी यांनाही फोटोसाठी पुन्हा फ्रेममध्ये येण्यास सांगितल्याचं समोर आलं आहे.

मात्र, फोटोसेशन संपवून सर्वजण निघत असताना एका फोटोग्राफरकडून रणबीरला वारंवार पोज देण्यास सांगितलं जात होतं. तो फोटोग्राफर रणबीरला आलिया आणि विकीसोबत पुन्हा फोटो देण्यास सांगत होता. यामुळे रणबीर काहीसा नाराज झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

‘बहुत बोल रहा है तू…’ म्हणत रणबीरची प्रतिक्रिया

रणबीर तिथून निघत असताना फोटोग्राफरच्या बोलण्यावर त्याने मागे वळून प्रतिक्रिया दिली. “बहुत बोल रहा है तू हा” असं रणबीर म्हणताना ऐकू येत आहे. या छोट्याशा प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

या प्रसंगानंतर रणबीर आलियासोबत गाडीकडे जाताना दिसला. व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्येही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

Netflix Trending: Netflix वर कोणता सिनेमा गाजतोय? 2 तास 21 मिनिटांच्या अॅक्शन-थ्रिलरने सूर्याच्या चित्रपटाला टाकलं मागे

‘लव्ह अँड वॉर’मध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार त्रिकूट

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांना पहिल्यांदाच एकाच चित्रपटात घेऊन येणार आहे. चित्रपटाची कथा आणि पात्रांबाबत निर्मात्यांनी अद्याप बरीच माहिती गुप्त ठेवली आहे. मात्र, माध्यमांमधील वृत्तांनुसार हा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित रोमँटिक वॉर ड्रामा असल्याचं सांगितलं जात आहे.

रणबीर आणि आलिया यापूर्वी ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एकत्र दिसले आहेत. रणबीर आणि विकी यांनी ‘संजू’मध्ये काम केलं आहे, तर आलिया आणि विकीची जोडी ‘राझी’मध्ये पाहायला मिळाली होती. आता हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकाच पडद्यावर दिसणार असल्याने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण

२१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार चित्रपट

‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शनाची तारीख २१ जानेवारी २०२७ अशी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, रणबीर कपूरचा ‘रामायण – पार्ट वन’ हा चित्रपट दिवाळी २०२६मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील काळात रणबीरचे दोन मोठे प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Web Title: Ranbir kapoor photographer bahut bol raha hai tu alia vicky viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा मॉडर्न अंदाजात; जंपसूट घालून ‘करण अर्जुन’च्या गाण्यावर धरला ठेका
1

Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा मॉडर्न अंदाजात; जंपसूट घालून ‘करण अर्जुन’च्या गाण्यावर धरला ठेका

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी
2

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी

Netflix Trending: Netflix वर कोणता सिनेमा गाजतोय? 2 तास 21 मिनिटांच्या अॅक्शन-थ्रिलरने सूर्याच्या चित्रपटाला टाकलं मागे
3

Netflix Trending: Netflix वर कोणता सिनेमा गाजतोय? 2 तास 21 मिनिटांच्या अॅक्शन-थ्रिलरने सूर्याच्या चित्रपटाला टाकलं मागे

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण
4

Ramayana New Posters: ‘रामायण’चे नवे पोस्टर्स रिलीज; राम-सीता आणि लक्ष्मणाची मनमोहक झलक, लंकेत उभा दिसला रावण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.