
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मालिका विश्वात स्टार प्लस हे नेहमी वैविध्यापूर्ण मालिका आणि कंटेंटमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतं. मिळालेल्या माहितीनुसार स्टार प्लसकडून प्रेक्षकांसाठी एक भव्य फॅशन स्पेशल कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. ‘फॅशन के रंग, रिश्तों के संग’ या आगामी शोबद्दल सध्या मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चॅनल हा कार्यक्रम टेलिव्हिजनचा स्वतःचा “मेट गाला” बनवण्यासाठी पूर्ण तयारीत आहे.संपूर्ण स्टार परिवार एकाच मंचावर येऊन हा फॅशन सोहळा साजरा करणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हा भव्य कार्यक्रम १ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार असून, यात संपूर्ण स्टार परिवार एकत्र येणार आहे. फॅशन, मनोरंजन आणि आकर्षक क्षणांचा संगम असलेल्या या स्टारस्टड नाईटमध्ये प्रेक्षकांना अनेक खास परफॉर्मन्स आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळणार आहेत.या भव्य फॅशन सोहळ्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून, ‘फॅशन के रंग, रिश्तों के संग’ हा कार्यक्रम टेलिव्हिजनवरील एक खास आकर्षण ठरणार आहे.या खास शोमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या टेलिव्हिजन कलाकारांना त्यांच्या नेहमीच्या पडद्यावरील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात अनेक कलाकार भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या राज्य-प्रेरित पारंपरिक पोशाखांमध्ये रॅम्पवर उतरतील. प्रेम आणि राही हे गुजराती संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पारंपरिक वेशभूषेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. तर सायली आणि सचिन महाराष्ट्राची संस्कृती सादर करतील.
त्याचप्रमाणे अरमान आणि अभिरा राजस्थानच्या रंगतदार परंपरेचे दर्शन घडवतील, तर सृती आणि शब्बीर मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतील. ईशान आणि नयनिका बंगाली पारंपरिक लूकमध्ये दिसणार असून अंगद आणि वृंदा गुजराती-प्रेरित वेशभूषेत रॅम्पवर झळकणार आहेत.
फॅशन, संस्कृती आणि मनोरंजन यांचा संगम असलेल्या या स्टारस्टड नाईटमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.या भव्य सोहळ्यात अनेक कलाकार त्यांच्या नेहमीच्या पडद्यावरील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि ग्लॅमरस अवतारात रॅम्पवर झळकणार आहेत.
या शोबाबत बोलताना सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या Rupali Ganguly यांनी आपले खास मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, “मी काही दिवसांपूर्वी एक मेट गाला वाली पोस्ट टाकली होती. सगळे फॅन्स आपले कॉस्च्युम बदलून मेट गाला लूकमध्ये येत होते ते पाहून मला खूप मज्जा येत होती. त्यातूनच स्टार प्लसवाल्यांना ही कल्पना सुचली आहे. मला हे खूप एन्जॉय करायला मिळत आहे कारण असे कपडे घालण्याची संधी क्वचितच मिळते. अनुपमा तर नेहमी कॉटन साडीतच दिसते, त्यामुळे मला नक्कीच काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, या खास भागाचा अनुभव खूप वेगळा आणि मजेशीर आहे आणि प्रेक्षकांनी हा स्टार प्लस स्पेशल भाग नक्की पाहावा. १ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता हा भव्य फॅशन इव्हेंट प्रसारित होणार आहे.