Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘प्रत्येक मुलीला चंडिका व्हावंच लागतं,’ ‘दशमी’च्या निमित्ताने गौरी इंगवलेने व्यक्त केल्या भावना

Exclusive: ‘दशमी’ या चित्रपटात लक्ष्मीपासून ते चंडिकेपर्यंत अवतार दाखवणारी अभिनेत्री गौरी इंगवलेने नवराष्ट्रसह खास गप्पा मारल्या आहेत. दुर्गा म्हणजे तिच्यासाठी नेमकं काय जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 19, 2026 | 07:16 AM
Exclusive: गौरी इंगवलने व्यक्त केले दुर्गेचे आयुष्यातील स्थान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Exclusive: गौरी इंगवलने व्यक्त केले दुर्गेचे आयुष्यातील स्थान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

लवकरच ‘दशमी’ चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे ती अभिनेत्री गौरी इंगवलेने. गौरीने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी भूमिका लक्ष्मी ती साकारत आहे. सध्या नवरात्र चालू आहे आणि तिला ही भूमिका करताना अधिक चांगल्या पद्धतीने महिलांच्या समस्या समजून घेता आल्या. लक्ष्मी या साध्या मुलीपासून ते तिला चंडिका नक्की का व्हावं लागतं याची कहाणी म्हणजे दशमी. याच निमित्ताने गौरीने ‘माझ्यातील दुर्गा’मध्ये मनापासून व्यक्त होत गप्पा मारल्या. 

सध्या तुझा ‘दशमी’ चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तू ‘लक्ष्मी’ साकारतेयस आणि गाण्यांमध्ये तुझं रौद्र ‘चंडिका’ रूप पाहायला मिळतंय. हा साध्या मुलीपासून थेट दुर्गेचं रूप घेण्यापर्यंतचा प्रवास तुझ्यासाठी कलाकार म्हणून कसा होता? विचारल्यावर गौरी इंगवले म्हणाली की, ‘ही लक्ष्मी भूमिका साकारताना खूप मोठं आव्हान होतं. लक्ष्मी ही प्रत्येक घरात असते पण ती चंडिकेचं रूपही घेऊ शकते. नवरात्रीत जशी दुर्गादेवीची ९ रुपं असतात ती प्रत्येक महिलेत पहायला मिळतात आणि या भूमिकेत ती मला साकारता आली त्यामुळे मला स्वतःला मी भाग्यवान समजते. 

सध्या समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या अत्यंत त्रासदायक आहेत. आपण घरी मुलीचा जन्म झाल्यावर लक्ष्मी आली असं म्हणतो पण समाजात त्यांना दुर्गेचं रुप घ्यावं लागतं, कारण तसे प्रसंग त्यांच्याबरोबर घडत असतात. दुर्देवाने चंडिका व्हावंच लागतं. हा प्रवास लक्ष्मीपासून चंडिकेचा प्रवास करताना खूप काही शिकायला मिळालं.’ 

गौरीचा दशमी चित्रपटातील लुक

Exclusive: ‘कधीही हरून जाऊन आत्मविश्वास गमावू नका’, शैला काणेकर यांचा महिलांना मोलाचा सल्ला

सध्या तुझं काम प्रेक्षकांना खूप आवडतंय. ‘दशमी’ चित्रपटाच्या निमित्ताने किंवा तुझ्या सध्याच्या कामाच्या निमित्ताने चाहत्यांकडून तुला मिळालेली सगळ्यात छान दाद कोणती आहे? या प्रश्नावर गौरी मनापासून हसली आणि म्हणाली की, ‘कामाचं कौतुक होतंय तर मला खूप छान वाटतंय. आतापर्यंत खूपच सौम्य भूमिका केल्या आहेत आणि आता अगदी वेगळी भूमिका करत असल्यामुळे सगळ्या स्तरातून मला खूप प्रेम मिळतंय. दोन – तीन वेळा कौतुक केल्यानंतर माझं नाव गौरी असल्यामुळे आपल्या मुलीचं नावही गौरी ठेवावं असं काही जण भेटल्यानंतर म्हणाले आणि ती माझ्यासाठी सर्वात मोठी दाद आहे असं मी म्हणेन. 

आजकाल समाजामध्ये जे काही चाललं आहे त्यातून खूपच राग येतो आणि संताप होतोय. हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या कामातून एका जरी मुलीला प्रेरणा मिळाली ना तर ती मुलगी अधिक मजबूत झाली आणि समाजावर माझ्या कामाचा प्रभाव पडला तर मला अधिक चांगलं वाटेल असं मला वाटतं.’ 

जेव्हा तू पडद्यावर हातात शस्त्र घेऊन किंवा अन्यायाविरुद्ध उभी राहतेस, तेव्हा वैयक्तिक पातळीवर गौरीला स्वतःमध्ये किती बदल जाणवला? गौरी पटकन म्हणाली, ‘हो पडद्यावर मी हातात शस्त्र घेऊन उभी राहतेय. पण मला स्वतःला अभिनेत्री म्हणून खूप उर्जा मिळाली. कारण तुम्ही जेव्हा अभिनय करता तेव्हा ते स्वतःला समजून घ्यावं लागतं आणि या चित्रपटातून मी ते समजून घेतलं आहे. लक्ष्मी ही भूमिका जे काही सहन करत आहे ते तितक्याच उत्कटतेने येण्यासाठी मला ते जाणवून घेणं महत्त्वाचं होतं. वैयक्तिक पातळीवर मला माझ्यात खूप बदल जाणवला, कारण मला यातून खूप काही शिकायला मिळालं. महिलांनी अन्यायाविरूद्ध आवाज उचलणं खूप गरजेचे आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर शस्त्र हातात नसेल तरीही ती उर्जा मुलींना यातून मिळेल असा मला विश्वास वाटतो.’ 

तुझ्या मते ‘आजची दुर्गा’ कशी आहे? पूर्वीच्या काळातील सहनशील स्त्री आणि आजची ‘Gen-Z’ काळातील स्वाभिमानी मुलगी, या नात्यात तुला काय फरक वाटतो?

पूर्वीची स्त्री आणि आजच्या महिलांमध्ये खूपच फरक आहे. खूप चांगला फरक वाटतो. कारण एका चौकटीत राहायच्या पूर्वी महिला राहयाच्या. पण आता मुली अत्यंत मजबूत झाल्या आहेत आणि आता सगळ्याच महिला प्रत्येक कामात पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन उभ्या राहतात आणि स्वतःचा स्वाभिमानही जपतात हे अधिक अभिमानास्पद आहे. 

तुझ्या खऱ्या आयुष्यात, तुझी ‘पहिली दुर्गा’ कोण आहे, जिच्याकडून तुला आयुष्यात प्रत्येक संकटाशी लढण्याची आणि खंबीर राहण्याची प्रेरणा मिळाली? यावर गौरी अगदी मनापासून म्हणाली की, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात पहिली दुर्गा आणि पहिली देवी ही आपली आई असते आणि माझीही आई माझी दुर्गा आहे. पण प्रत्येक महिलेकडून मी संकटांशी लढायला आणि मजबूत रहायला शिकते आहे असं मला वाटतं.’ 

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत

आजकाल मुलींवर होणारे अत्याचार पाहता, प्रत्येक मुलीने केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही सक्षम असणं किती गरजेचं आहे असं तुला वाटतं? गौरीने अगदी स्पष्टपणे सांगितलं की, ‘आजकाल समाजात जे काही घडत आहे. सुरक्षितता खूपच महत्त्वाची आहे. रात्र झाल्यावर एक भीती मनात असतेच. कितीही नाही म्हटलं तरीही हे अजून नाकारता येत नाही. सुरक्षेसाठी प्रत्येकीला कधी ना कधी दुर्गा व्हावंच लागतं. वेळोवेळी योग्य निर्णय घेत पुढे जाणं आणि दुर्गावतार धारण करणं आजच्या जगात खूपच महत्त्वाचं वाटतं मला. 

प्रत्येक मुलीने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं अत्यंत गरजेचे आहे. याचं उदाहरण मला मुद्दाम द्यावं वाटतं की, माझी बहीण शैला कुलकर्णी जी पहिली महिला Action दिग्दर्शक आहे आणि तिने महाराष्ट्र पोलीस विभागासह महिला संरक्षणासाठी प्रशिक्षण देते. तिच्याकडून मी बरंच ऐकलंय आणि शिकते आहे. अनेक अशा मुली आहेत ज्यांनी ती मार्गदर्शन देते आहे.’ या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्यभरासाठी गौरीला दुर्गेच रुप कळलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. 

Web Title: Exclusive dashmi fame gauri ingawale shared thoughts on movie and stree shakti dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 07:16 AM

Topics:  

  • Exclusive Navarashtra-Navadurga
  • Exclusive Series
  • Navarashtra Exclusive
  • navarashtra vishesh

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: परदेशी भाषा शिकून करिअर घडवायचंय? प्रियंका सैतवडेकरने दिला यशाचा मंत्र
1

Exclusive Navarashtra-Navadurga: परदेशी भाषा शिकून करिअर घडवायचंय? प्रियंका सैतवडेकरने दिला यशाचा मंत्र

Exclusive: ‘शिकतेय, चुकतेय, पडतेय परत शिकतेय, पण मला अभिमान आहे स्वतःचा’, रुचिता जामदारचा आत्मविश्वास
2

Exclusive: ‘शिकतेय, चुकतेय, पडतेय परत शिकतेय, पण मला अभिमान आहे स्वतःचा’, रुचिता जामदारचा आत्मविश्वास

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास
3

Exclusive Navarashtra-Navadurga: रुळांवर विखुरलेले मृतदेहाचे अवशेष अन् रक्ताचा सडा, पॉईंट्समन रूपाली खरे यांचा थक्क करणारा प्रवास

Exclusive: ‘कधीही हरून जाऊन आत्मविश्वास गमावू नका’, शैला काणेकर यांचा महिलांना मोलाचा सल्ला
4

Exclusive: ‘कधीही हरून जाऊन आत्मविश्वास गमावू नका’, शैला काणेकर यांचा महिलांना मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.