Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘कधीही हरून जाऊन आत्मविश्वास गमावू नका’, शैला काणेकर यांचा महिलांना मोलाचा सल्ला

Exclusive: सन मराठीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत मनोरमा या नकारात्मक भूमिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री शैला काणेकरने आपल्या अनुभवाबाबत आणि महिलांबाबत परखड मत मांडलं आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 17, 2026 | 07:15 AM
Exclusive: सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' मध्ये मनोरमाची भूमिका साकारणाऱ्या शैला काणेकर यांच्याशी गप्पा

Exclusive: सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' मध्ये मनोरमाची भूमिका साकारणाऱ्या शैला काणेकर यांच्याशी गप्पा

Follow Us
Follow Us:

Exclusive: सन मराठीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेतून मनोरमा या भूमिकेतून अभिनेत्री शैला काणेकर सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आतापर्यंत २५-२७ वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारतानाचा अनुभव आणि स्त्री शक्ती, आई असताना करावा लागणारा संघर्ष याबाबत अगदी मनापासून ‘माझ्यातली दुर्गा’ या सिरीजमधून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. 

‘सखा माझा पांडुरंग’ मधील मनोरमा साकारतानाचा अनुभव कसा आहे सांग असं विचारल्यावर शैला यांनी सांगितलं की, ‘ही भूमिका करताना मला खूपच मजा येत आहे. आतापर्यंत नकारात्मक भूमिका मला मिळाली नव्हती. जेव्हा भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की, नक्की काय विचार करून मला ही भूमिका देण्याचं ठरवलं आहे. पण मी ती भूमिका स्वीकारली आणि भूमिका ऐकताना जितकं मनोरमाबाबत ऐकलं त्यापेक्षा पलीकडे ही व्यक्तिरेखा असल्याचं लक्षात आलं. 

मी भूमिका करायला लागले तेव्हा मी ही भूमिका चांगली करू शकेन असा विश्वास लेखक, दिग्दर्शकांना होता आणि आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघताना तो विश्वास सार्थ ठरला असं मला वाटतं. कारण मनोरमा माझ्या अंगवळणी पडली. सुरूवातीला मला खूप त्रास व्हायचा कारण या भूमिकेसाठी माझी खूप एनर्जी लागायची. कोणतीही भूमिका असली ती माझ्यामध्ये सीन करताना भिनते आणि मग एनर्जी टिकवून ठेवताना त्रास व्हायचा. पण आता मी अत्यंत सहजपणे ते साकायराला शिकले आहे.’

Exclusive: ‘प्रत्येक अडचण ही आव्हान म्हणून घेते, त्यातूनच स्त्रीशक्ती कळते’, दीप्ती केतकरचा दुर्गाशक्तीवर पूर्ण विश्वास

तुम्ही मराठी सिनेसृष्टीला अनेक वर्षं दिली आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात जेव्हा भूमिका बदलत गेल्या, तेव्हा स्वतःला इंडस्ट्रीत टिकवून ठेवण्यासाठी लागणारा आत्मविश्वास तुम्ही कसा जपला? यावर शैला यांनी सांगितलं की, ‘करिअरची सुरूवात अनपेक्षित होती. माझ्या घरात कलेचं वातावरणच नव्हतं. पण या क्षेत्रात आले तेव्हा घरातल्यांना नक्कीच धक्का होता. विनय आपटे यांनी माझं काम एकांकिकेत पाहिलं आणि मालिकेत भूमिकेसाठी विचारलं. एकावेळी मी तीन मालिकांमध्ये काम करत होते. तो काळ खूपच आनंददायी होता. ५-६ वर्ष सलग काम केलं. पण त्यानंतरचा दोन वर्षाचा काळ मात्र खूपच संघर्षदायी गेला. 

आई अभिनय करण्याच्या विरोधात होती आणि तरीही मी हे नोकरी सोडून हे करिअर करायचं ठरवलं होतं. पण त्या काळात खचले नाही, मी स्वतःवर मी खूपच काम केलं. खूप पुस्तकं वाचली, खूप नाटकं, चित्रपट पाहिले. पण त्यात मी हरले नाही. तेव्हाही मी नोकरी नाही शोधली. मी नव्याने स्ट्रगल केलं. ऑडिशन पाठवल्या, फोटो दिले, पण आत्मविश्वास नाही हरवला आणि त्यानंतर पुन्हा नव्याने उभी राहिले. गेले २६-२७ वर्ष मी काम करते आहे हीच त्याची पोचपावती आहे.’ 

महिलांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणता सल्ला द्याल? यावर अगदी हळवेपणाने शैला यांनी सांगितलं की, ‘या काळात कधीही पराभव मानू नका, हरू नका. आत्मविश्वास डगमगू देऊ नका. अशा काळात मानसिकरित्या व्यस्त रहायला हवं. आपल्याला  स्वतःला कसं अधिक चांगलं घडवता येईल याचा विचार करायला हवा. तो काळ तुम्हाला शिकण्याचा असतो. या काळात स्वतःला मानसिकरित्या अधिक मजबूत ठेवणं गरजेचे आहे.’ 

जेव्हा कामं मिळाली नाहीत तेव्हा इंडस्ट्रीचा राग आला का? या प्रश्नावर स्वतःकडेच शैला काणेकर यांनी दोष घेतला, ‘मला नाही आला राग. माझंच चुकलं असेल असं मला वाटतं. प्रोजेक्ट चालू असताना तितक्या पुरतीच कनेक्टेड असते हा माझा ड्रॉबॅक आहे. माझीच चूक असणार ती, मला कुणाचाच राग नाही. मंदार देवस्थळी, संगीत कुलकर्णी यांच्यासह खूप काम केलं. वाईट वाटतं की इतकं काम केल्यानंतरही कोणाला माझं नाव का बरं सुचलं नसेल पण पुन्हा यातही दोष माझाच आहे असं मला वाटतं.’

पूर्वीच्या आणि आताच्या कास्टिंगनुसार जुन्या अनुभवी कलाकारांवर अन्याय होतो असं वाटतं का? यावर शैला काणेकर यांनी अगदी स्पष्ट मत मांडलं, ‘पूर्वीचा काळ हा तेव्हाचे दिग्दर्शक किंवा निर्माते, हा कलाकार हवाच असं म्हणायचे. पण आता फॉलोअर्स किती आहे यावर कामासाठी घेतलं जातं. पण त्यावर कोणाचं टॅलेंट ठरवू नका. मला सोशल मीडियामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. पण अशा व्यक्तींना घेतल्यानंतर बरोबरीच्या कलाकरांना काम करताना त्रास होतो. या दरम्यान निर्माता, आर्टिस्ट थकतात याचा विचार व्हायला पाहिजे. त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून मालिका पाहिली जाते का? तर असं अजिबात नाही. मालिकेची गोष्ट ही दणदणीत असायला हवी आणि मग काम करणारे कलाकार. फॉलोअर्स पाहून कलाकार निवडण्याच्या मी पूर्ण विरोधात आहे’

स्त्री कलाकारांना संघर्षाला तोंड द्यावं लागतंय असं वाटतं का? यावर शैला यांनी ठामपणे सांगितलं की, ‘बरेचदा मिळणाऱ्या मानधनाच्या बाबतीत अजूनही संघर्ष आहे असं मला वाटतं. काही नावं फायनल होतात पण महत्त्वाचा मुद्दा मानधन हा येतो. जेव्हा बजेट हा मुद्दा येतो तेव्हा चॅनेलपर्यंत एखादं नाव जाताना ते बारगळतं. वरपर्यंत नाव गेलंच नाही तर कास्टिंग होत नाही. कलाकार नेगोशिएट करत असतात. पण निदान बोलायला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे अजूनही हा संघर्ष आहे असं मला वाटतं’

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये सखुबाईंच्या जीवनकथेचा नवा टप्पा; प्रेक्षकांना मिळणार भावनिक अनुभव

अनेक महिलांना Mumma Guilt जाणवतो, तुम्हाला कधी जाणवलं का आणि यातून कशा बाहेर पडलात? या प्रश्नावर शैला काणेकर प्रचंड भावूक झाल्या आणि म्हणाल्या की, ‘हो मलाही यातून जावं लागलं आहे. २०२३ हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्षाचा काळ होता आणि मला मुलापासून दूर राहून काम करावं लागलं होतं. पण मला प्रत्येक आईला हेच सांगायचं आहे की, असा सल घेऊन राहू नका, कारण आपण आपल्या कुटुंबसाठी हे करत असतो. आपण अनेकदा मनाविरुद्ध करत असतो पण ते कुटुंबासाठी असतं त्यामुळे मानसिकरित्या मजबूत राहणं गरजेचे आहे. तुम्ही खूप वेळा हरता, खचून जाता, संपलं असं खूप वेळा वाटतं. पण ती एक शिकवण असते. ज्यातून आपण शिकतो की, यातून कसं बाहेर यायचं. रडा पण त्यातून शिका आणि पुढे जात रहा.’ 

कधी तुम्हाला कोणत्या अन्यायाला सामोरं जावं लागलं आहे का? यावर शैला यांनी सांगितलं की, ‘२८ वर्षात मला कधीच चुकीचे अनुभव आले नाहीत. कोणी मला त्रास दिलाय किंवा नको तिथे स्पर्श किंवा बोलणं असं काहीच झालं नाही. पण आयुष्यात एकदा सीएसटीवर एक माणसाने मुद्दाम चुकीचा स्पर्श केला होता आणि त्याला खूप धोपटलं होतं. फार अन्याय मी नाही सहन करू शकत. अन्यायाला वाचा फोडणं खूपच गरजेचे आहे. कुठल्याच बाईने हे सहन नाही केलं पाहिजे. कारण बोललात तर मार्ग सुचवू शकतो.’

दुर्गेचं रुप कसं बदलत आहे असं तुम्हाला वाटतं? यावर अगदी सहजपणाने शैला यांनी सांगितलं की, ‘मला या पिढीतली दुर्गा मला आवडते.कारण ती सहन न कऱणारी आहे. बिनधास्त आहे, स्पष्ट बोलणारी आहे. पुढची पिढी बोलून, गोष्टी करून मोकळी होत आहे. आजमध्ये जगणारी ही पिढी आहे आणि तसंच असायला हवं. 

सरतेशेवटी प्रत्येकाला आपल्या नशिबाचं जे असतं ते मिळतं आणि ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही असा विश्वास दर्शवत शैला यांनी मनापासून निरोप घेतला. 

Web Title: Exclusive sun marathi sakha majha pandurang fame shaila kanekar opened up about her experience and thought on durga shakti dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • Navarashtra Exclusive
  • sun marathi

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास
1

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत
2

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा
3

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल
4

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.