Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Famous Singer Death : संगीत क्षेत्राची ‘अम्मा’ काळाच्या पडद्याआड! युगाचा अंत, 50 हजार गाण्यांची यादी; S Janaki यांचे निधन

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांचे म्हैसूर येथे निधन झाले असून संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. १९५८ मध्ये गायन क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये सुमारे ४८ हजार गाण्यांना आवाज दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 12, 2026 | 09:13 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘राधा प्यार दे’ ही त्यांची हिंदीतील लोकप्रिय गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
  • आपल्या यशाचे श्रेय संगीतकार व गीतकारांनाही देत असत.
  • एस. जानकी यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज पार्श्वगायिका एस. जानकी यांचे निधन झाले. म्हैसूर येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वाने एक सुमधुर आणि अजरामर आवाज गमावला आहे. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९५८ मध्ये एस. जानकी यांनी गायन क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘मिस ५८’ या चित्रपटासाठीही गायन केले. त्यानंतर हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. कारकिर्दीत त्यांनी सुमारे ४८ हजार गाण्यांना आवाज दिल्याचे मानले जाते. ‘यार बिना चैन कहाँ रे’, ‘बोल बेबी बोल रॉक अँड रोल’ आणि ‘राधा प्यार दे’ ही त्यांची हिंदीतील लोकप्रिय गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.

‘भाईजान… तुस्सी ग्रेट हो!’ सलमानच्या प्रॉपर्टीत वाढ? ‘तो’ फ्लॅट विकला पण नफा मिळवला छ्प्परफाड

एस. जानकी यांना भारतीय सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता. मात्र, दक्षिण भारतीय कलाकारांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. संगीतविश्वात त्या प्रेमाने ‘अम्मा’ या नावाने ओळखल्या जात. आपल्या गायनकलेला त्या ईश्वराची देणगी मानत आणि आपल्या यशाचे श्रेय संगीतकार व गीतकारांनाही देत असत.

एस. जानकी आणि दिग्गज गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची जोडी भारतीय संगीतसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. २०१७ मध्ये त्यांनी गायनातून निवृत्ती जाहीर केली. म्हैसूर येथे झालेला त्यांचा अखेरचा संगीत कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.

Indrajaal Trailer : बरसणार अघोरी आभाळ… ‘इंद्रजाल’! जंगल नाही इंद्राचा जाळं; पावलापावला मृत्यूचे सावट, थरथरवणारा थरार

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाल्यास, १९५९ मध्ये त्यांनी व्ही. रामप्रसाद यांच्याशी विवाह केला. १९९७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पतींचे निधन झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा मुरली कृष्णा ऑडिओ व्यवसाय सांभाळत होता. जानेवारी २०२६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचाही मृत्यू झाला होता. आता एस. जानकी यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Web Title: Famous singer bol baby bol fame s janki passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • Death
  • Famous Singer

संबंधित बातम्या

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
1

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
2

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
3

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
4

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.