
Govinda on After Lalbaugcha Raja Visit: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गोविंदाने ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, तो लालबागच्या राजाच्या दर्शनाला का गेला होता. तो म्हणाला मी तिथे माझ्या नवीन सिनेमासाठी गेलो होतो. माझा ‘रुपा’ नावाचा सिनेमा येतोय. बऱ्याच वर्षानंतर मी परत सिनेमात ऍक्टिव्ह होतोय, त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. सिनेमा हिट होऊ दे म्हणून प्रार्थना करायला गेलो होतो.यावेळी त्याने त्याच्या जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला,
यावेळी गोंविदा म्हणाला की, “आधी मी करिश्मा कपूर सोबत पण मंदिरात दर्शनाला गेलो होतो, तेव्हा आमच्या सिनेमाला यश मिळालं होतं. रवीना टंडन सोबत पण मी मंदिरात गेलो होतो. हा माझा जुना नियम आहे, नवीन सिनेमा आला की मी देवाचं दर्शन घेतो. त्यामुळे यावेळी पण रुपा सिनेमाच्या यशासाठी आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.”
#WATCH | Mumbai | On reports on him participating in a reality show, Actor Govinda says, “Nothing has been decided yet. Talks are underway. I might do a show in the future, but nothing is confirmed right now… I don’t watch many reality shows. If I find something interesting, I… pic.twitter.com/shQ7TKKvtk — ANI (@ANI) September 24, 2026
कोमल रानी स्वर्णकार ही मराठी आणि हिंदी सिनेमात काम करते. गोविंदाच्या ‘रुपा’ सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दोघे एकत्र दर्शनाला गेले होते. पण नेटकऱ्यांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. गोविंदा आणि कोमल एकत्र दिसले, हसून बोलत होते, त्याचे व्हिडिओ आले आणि लोकांनी लगेच अफेअरचा शिक्का मारला.
“माझं खाजगी आयुष्य खाजगीच राहू द्या या सगळ्या अफवांवर गोविंदा थोडा नाराज झाला आहे. तो म्हणाला की, कोमल सोबत माझं नातं फक्त कामापुरतं आहे. ते एक व्यावसायिक नातं आहे. ती माझ्या सिनेमाची हिरोईन आहे, आम्ही एकत्र काम करतोय. यापेक्षा जास्त काही नाही. माझ्या खाजगी आयुष्याला तुम्ही असं चर्चेचा विषय बनवू नका. माझं लक्ष आता फक्त माझ्या कामावर आहे. मी परत सिनेमात येतोय, मला माझ्या कामावर फोकस करायचं आहे. अशा खोट्या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होतो.”
Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’
गोविंदाने स्पष्ट केलं आहे की त्यांच्या नात्यांमध्ये सगळं ठीक आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. खरं तर गोविंदा गेल्या काही वर्षांपासून सिनेमापासून लांब होता. आता तो ‘रुपा’ सिनेमातून कमबॅक करतोय. त्याला वाटतंय की लोकांनी त्याच्या कामाबद्दल बोलावं, त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल नाही. बाप्पाच्या दर्शनाला जाणं ही त्याची श्रद्धा आहे, त्याचा वेगळा अर्थ काढू नका असं त्याने सांगितलं आहे.