Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त १३ ऑगस्टला मुंबईत ‘प्रणाम’ संगीतोत्सव रंगणार. जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल कुरेशी, तौफिक कुरेशींसह दिग्गज कलाकार सहभागी होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 12, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Guru Purnima: गुरु-शिष्य परंपरेचा गौरव आणि गुरूंच्या संगीतवारशाला अभिवादन करण्यासाठी उस्ताद अल्लारखा इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकतर्फे ‘प्रणाम – गुरुपौर्णिमा सोहळा’ या विशेष संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते रात्री ११ वाजेपर्यंत वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई येथे हा दिवसभराचा कार्यक्रम रंगणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याला प्रवेश विनामूल्य असून तो सर्वांसाठी खुला आहे.

उस्ताद अल्लारखा आणि उस्ताद झाकीर हुसेन यांच्या संगीत, शिस्त, ज्ञान आणि कलात्मक मूल्यांना अभिवादन करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरु-शिष्य परंपरेतून पिढ्यानपिढ्या पुढे आलेला संगीतवारसा विविध कलाकारांच्या सादरीकरणातून रसिकांसमोर उलगडणार आहे.

जयतीर्थ मेवुंडींच्या एकल गायनाने होणार सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांच्या एकल गायनाने होणार आहे. या मैफलीत ते दुर्मीळ दुपारच्या रागांचे सादरीकरण करणार आहेत.

निखळ स्वर आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची सखोलता अनुभवण्याची संधी या मैफलीत रसिकांना मिळणार आहे. गुरु-शिष्य परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणाऱ्या ज्ञानाचा सूर या सत्रातून उमटणार आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या बदलत्या रूपावर चर्चा

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘Changing of Face and Phase of Indian Classical Music’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तबलावादक योगेश सम्सी, गायिका देवकी पंडित, कलारसिक राजीव सेठी आणि सतारवादक मेहताब अली नियाझी या चर्चेत सहभागी होणार आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताचं बदलतं स्वरूप, सादरीकरणातील बदल, कलाकार-रसिकांचं बदलतं नातं आणि बदलत्या काळाशी संगीत क्षेत्र जुळवून घेत असताना निर्माण होणारी आव्हानं यावर या चर्चेत विचारमंथन होणार आहे. पंचम निषादचे संस्थापक शशी व्यास या सत्राचे सूत्रसंचालन करणार आहेत.

Marathi Cinema: मराठी सिनेसृष्टीसाठी मोठी बातमी! पॅनोरमा स्टुडिओजच्या साथीने सुजय डहाके आणणार ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’

तालवाद्यांच्या मैफलीने होणार सांगता

‘प्रणाम’ सोहळ्याची सांगता उस्ताद फजल कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील तालवाद्यांच्या विशेष मैफलीने होणार आहे. या मैफलीत तौफिक कुरेशी, गिनो बँक्स, जयतीर्थ मेवुंडी, श्रीधर पार्थसारथी, शेल्डन डिसिल्वा, संगीत हल्दीपूर आणि नितीन शंकर यांसारखे नामांकित कलाकार सहभागी होणार आहेत.

याशिवाय रामकांत गायकवाड आणि भाग्यश्री पांचाळे यांच्या गायनाचीही मेजवानी रसिकांना मिळणार आहे. विविध पिढ्या आणि संगीत परंपरांतील कलाकार ताल, वादन आणि सहवादनाच्या माध्यमातून एकत्र येणार असल्याने हे सत्र विशेष ठरणार आहे.

गुरु-शिष्य परंपरेला मानाचा मुजरा

भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरु-शिष्य नातं हे केवळ राग किंवा तंत्र शिकण्यापुरतं मर्यादित नाही. शिस्त, सौंदर्यदृष्टी, मूल्यं, अर्थनिर्णय आणि सातत्यपूर्ण रियाझातून विकसित होणारी संगीताची सखोल जाण या नात्याचा महत्त्वाचा भाग आहे.

याच परंपरेचा गौरव करत ‘प्रणाम’ हा सोहळा गुरूंच्या ऋणाची जाणीव करून देतानाच त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान, मूल्यं आणि संगीतपरंपरा पुढील पिढीकडे नेणाऱ्या कलाकारांचा सन्मान करणार आहे.

Sai Godbole: अभिनेत्री किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! सई गोडबोले बनली इंटरनॅशनल ब्रँडचा नवा चेहरा, आईचा आनंद गगनात मावेना

कार्यक्रमाचा तपशील

कार्यक्रम: प्रणाम – गुरुपौर्णिमा सोहळा
आयोजक: उस्ताद अल्लारखा इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक
दिनांक: १३ ऑगस्ट २०२६, गुरुवार
वेळ: दुपारी २ ते रात्री ११
स्थळ: वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई
प्रवेश: विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला

Web Title: Guru purnima pranam sangeetotsav jayateerth mevundi devaki pandit qureshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Guru Purnima
  • Marathi News

संबंधित बातम्या

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन
1

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास
2

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!
3

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी
4

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.