Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होम्बळे फिल्म्सची मराठीत दमदार एंट्री! ‘येतो का नाय’ या पहिल्या हिप-हॉप म्युझिकल फिल्मची घोषणा

KGF, Kantara आणि Salaar चे निर्माते Hombale Films आता मराठी सिनेमात ‘येतो का नाय’ या पहिल्या हिप-हॉप म्युझिकल फिल्मसह एन्ट्री करत आहेत. मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट युवांची भावना, मैत्री, प्रेम आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास दाखवणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 29, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • KGF आणि Kantara चे मेकर्स आता मराठीत
  • मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘येतो का नाय’ची घोषणा
  • पाहायला मिळणार युवांची भन्नाट म्युझिकल जर्नी
भारतीय सिनेसृष्टीला KGF, Kantaraसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस Hombale Films आता मराठी प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येत आहे. निर्मात्यांनी त्यांच्या पहिल्या मराठी हिप-हॉप म्युझिकल स्टोरी ‘येतो का नाय’ची अधिकृत घोषणा केली आहे.

विविध भाषा आणि संस्कृतींमध्ये दमदार कथा सादर करणाऱ्या होम्बळे फिल्म्सने या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचीही घोषणा केली असून ती “YKN – पहिला वार” या नावाने प्रदर्शित होणार आहे.

मुंबईसारख्या स्वप्नांच्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट युवा संस्कृती, हिप-हॉप, संगीत, भावना आणि वास्तव यांचा संगम असणार आहे. नव्या पिढीची भाषा, त्यांचे संघर्ष, स्वप्नं आणि उर्जा यांचं चित्रण या म्युझिकल जर्नीत पाहायला मिळणार आहे.

मराठी सिनेमात हिप-हॉप म्युझिकलचा हा अनोखा प्रयोग असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.KGF, Kantara आणि इतर अनेक यशस्वी चित्रपटांमुळे संपूर्ण देशात ओळख निर्माण करणारे Hombale Films आता मराठी सिनेमात नव्या जोमाने पाऊल ठेवत आहेत. विविध फिल्म इंडस्ट्रींमध्ये सातत्याने यश मिळवत असलेल्या या प्रॉडक्शन हाऊसनं कंटेंट-ड्रिव्हन आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या कथा मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याची खास ओळख निर्माण केली आहे.

होम्बळे फिल्म्सचा पहिला मराठी हिप हॉप चित्रपट

आता होम्बळे फिल्म्सनं आपल्या पहिल्या मराठी हिप-हॉप म्युझिकल स्टोरी ‘येतो का नाय’ (YETO KA NAAY)ची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती विजय किरगंदूर करत असून दिग्दर्शनाची धुरा सारंग संजीव साठे यांनी सांभाळली आहे.चित्रपटाची कथा सारंग संजीव साठे, सुजॉय जाधव, सृष्टी तावडे आणि श्रेयस सगवेकर यांनी एकत्र लिहिली आहे. सिनेमॅटोग्राफी हर्षवीर ओबेरॉय यांनी केली असून संगीताची जबाबदारी एवी प्रफुल्लचंद्र यांनी सांभाळली आहे.
सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू असून, याच वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी हिप-हॉप संस्कृतीच्या भन्नाट वाइबसह युवांची भावना, मैत्री, प्रेम, ओळख आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘येतो का नाय’ हा केवळ एक म्युझिकल चित्रपट नसून नव्या पिढीचा आवाज ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे..

Hombale Films हे भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रभावी आणि यशस्वी प्रॉडक्शन बॅनर मानले जाते. ‘KGF: Chapter 1’, ‘Kantara’, ‘Salaar: Part 1 – Ceasefire’ आणि *‘Mahavatar Narasimha’*सारख्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझींमुळे या बॅनरने देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटांद्वारे होम्बळे फिल्म्सने भारतीय सिनेमाचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून बॉक्स ऑफिसवरही मोठं योगदान दिलं आहे.

”पैशांची बॅग हरवली…”, ओळख नसतानाही सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात, प्रवीण तरडेंनी सांगितला परदेशातला न विसरता येणारा प्रसंग

विशेष म्हणजे, ‘महावतार नरसिंह’सारख्या चित्रपटातून भारतीय संस्कृतीची मुळे जपत उत्कृष्ट अॅनिमेशन सादर करण्यात आलं. या चित्रपटामुळे भारतीय अॅनिमेशन इंडस्ट्रीलाही नवी दिशा आणि उंची मिळाल्याचं मानलं जात आहे.गेल्या काही वर्षांत होम्बळे फिल्म्सने केवळ कन्नडच नव्हे तर तेलुगू, मल्याळम आणि इतर भारतीय फिल्म इंडस्ट्रींमध्येही आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. आता हेच प्रॉडक्शन हाऊस मराठी सिनेमात ‘येतो का नाय’सारख्या हिप-हॉप म्युझिकल चित्रपटाद्वारे नवा प्रयोग करत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

बॉक्स ऑफिसवरील यशानंतर ‘सुपर डुपर’ लवकरच झी5 मराठीवर; निर्मिती सावंत यांनी शेअर केले ‘सेटवरील’ खास किस्से

Web Title: Hombale films yeto ka naay marathi hip hop film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप
1

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न
2

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

Sanai Choughade Serial: सहा तास पावसात शूटिंग, सतत वर्कआउट! जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची जबरदस्त मेहनत; सांगितला अनुभव
3

Sanai Choughade Serial: सहा तास पावसात शूटिंग, सतत वर्कआउट! जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची जबरदस्त मेहनत; सांगितला अनुभव

Zee 5 ची मोठी घोषणा! मराठीसह ७ भाषांमध्ये मनोरंजनाचा मेगा धमाका; जाहीर केली नवी कंटेंट लाइनअप
4

Zee 5 ची मोठी घोषणा! मराठीसह ७ भाषांमध्ये मनोरंजनाचा मेगा धमाका; जाहीर केली नवी कंटेंट लाइनअप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.