Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jailer 2 Box Office: रजनीकांतचा ‘जेलर २’ ठरतोय बॉक्स ऑफिसचा किंग! चार दिवसांत ४०० कोटींची कमाई, ‘धुरंधर २’चा विक्रम मोडला

Jailer 2 Box Office: रजनीकांतच्या ‘जेलर २’ने अवघ्या चार दिवसांत जगभरात ४२४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. परदेशातील कमाईत चित्रपटाने ‘धुरंधर २’ला मागे टाकले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2026 | 09:40 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Jailer 2 Box Office:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे ‘थलायवा’ आणि सुपरस्टार रजनीकांत बॉक्स ऑफिसवर अजूनही दबदबा कायम राखताना दिसत आहेत. त्यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या कमाईत रविवारी मोठी वाढ झाली असून, त्याची एकूण जागतिक कमाई अंदाजे ४२४.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यासोबतच परदेशातील कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २: द रिव्हेंज’लाही मागे टाकले आहे.

चार दिवसांत ४२४ कोटींची कमाई

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसांत दमदार कामगिरी केली आहे. SACNILC च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने रविवारी भारतात ५५.८५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. त्यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण निव्वळ कमाई १९९.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चित्रपटाच्या भारतातील एकूण ग्रॉस कमाईचा आकडा अंदाजे २३४.२५ कोटी रुपये असून, परदेशातील बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कामगिरी केली आहे. परदेशातून मिळालेल्या अंदाजे १९० कोटी रुपयांच्या कमाईसह चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ४२४.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

रविवारी कमाईत मोठी वाढ

‘जेलर २’च्या कमाईचा आलेख पाहिला, तर पहिल्या दिवशी चित्रपटाने अंदाजे ५९.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर शुक्रवारी कमाईत घट होऊन हा आकडा ३७.१० कोटी रुपयांवर आला. मात्र, शनिवार आणि रविवारी चित्रपटाने पुन्हा जोरदार मुसंडी मारली.

रविवारी झालेली कमाई शनिवारच्या तुलनेत १८.२ टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडमध्येच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. रजनीकांत यांची लोकप्रियता आणि चित्रपटाबद्दल असलेली प्रेक्षकांची उत्सुकता यामुळे ‘जेलर २’ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Scam 2024: विद्या मालवडेची मायक्रोड्रामाच्या दुनियेत एन्ट्री; ‘स्कॅम २०२४’मधून उलगडणार सायबर फसवणुकीचं रहस्य

‘धुरंधर २’लाही टाकलं मागे

परदेशातील बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत ‘जेलर २’ने विशेष कामगिरी केली आहे. २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांमध्ये परदेशातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आघाडीवर असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

‘जेलर २’ने परदेशात पहिल्याच दिवशी अंदाजे ५७ कोटी रुपयांची कमाई केली, तर ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ने सुमारे ५२ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे परदेशातील पहिल्या दिवसाच्या कमाईत रजनीकांत यांच्या चित्रपटाने बाजी मारली आहे.

दरम्यान, रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ने उत्तर अमेरिकेत २५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करत ‘बाहुबली २’चा विक्रम मोडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीची चर्चा रंगली आहे.

आता ‘जेलर २’चं लक्ष्य ५०० कोटींवर?

अवघ्या चार दिवसांत ४२४.२५ कोटी रुपयांची जगभरातील कमाई केल्यानंतर आता ‘जेलर २’चा पुढील प्रवास महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या आठवड्यानंतरही चित्रपट कमाईचा हा वेग कायम ठेवतो का, याकडे चित्रपटसृष्टीचे आणि चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

रजनीकांत यांच्या स्टारडममुळे चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता, जागतिक बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य आता चर्चेत आहे. मात्र, आगामी दिवसांतील कमाईच चित्रपटाची पुढील वाटचाल स्पष्ट करेल.

Duniya Ki Thain Thain: एका विश्वासघाताने उद्ध्वस्त झालं आयुष्य; ‘विकी भैय्या’च्या सूडाची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Web Title: Jailer 2 box office collection rajinikanth movie ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Box Office
  • entertainment

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: बिग बॉस २० चा नवा होस्ट कोण? सलमान खानच्या जागी येणाऱ्या अभिनेत्याचं नाव आलं समोर!
1

Bigg Boss 20: बिग बॉस २० चा नवा होस्ट कोण? सलमान खानच्या जागी येणाऱ्या अभिनेत्याचं नाव आलं समोर!

Duniya Ki Thain Thain: एका विश्वासघाताने उद्ध्वस्त झालं आयुष्य; ‘विकी भैय्या’च्या सूडाची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2

Duniya Ki Thain Thain: एका विश्वासघाताने उद्ध्वस्त झालं आयुष्य; ‘विकी भैय्या’च्या सूडाची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
3

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व
4

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.