Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangana Ranaut Abhijeet English: १२वी पास कंगना की अमेरिकेतून परतलेला अभिजीत दिपके? कोणाची इंग्रजी भारी? अभिनेत्रीने दिला पुरावा

Kangana Ranaut Abhijeet English: कंगना रणौतने अभिजीत दीपके यांच्या इंग्रजी बोलण्याच्या क्षमतेवरून सोशल मीडिया पोस्ट शेअर करत टोला लगावला. दोघांच्या इंग्रजीची तुलना करणारी रील चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 11:38 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kangana Ranaut Abhijeet English: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या इंग्रजी बोलण्याच्या क्षमतेवर भाष्य करत दोघांची तुलना करणारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

कंगनाने शेअर केला व्हिडीओ

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक रील शेअर केली आहे. या रीलमध्ये सुरुवातीला अभिजीत दीपके इंग्रजीमध्ये सार्वजनिक विधान करताना दिसतात. त्यानंतर कंगना रणौत इंग्रजीमध्ये बोलत असल्याची क्लिप दाखवण्यात आली आहे.

ही रील शेअर करत कंगनाने लिहिलं, “बारावी पास कंगना रणौत विरुद्ध बॉस्टन युनिव्हर्सिटीच्या CJP दीपकची इंग्रजीची पातळी. एक जबरदस्त आहे, तर दुसऱ्याला रिबूटची गरज आहे.”

या पोस्टमधून कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपके यांच्या इंग्रजीवर निशाणा साधला आहे.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

इंग्रजीमुळे कंगनालाही करावा लागला होता संघर्ष

कंगना रणौतने यापूर्वी तिच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी भाषेमुळे आलेल्या अडचणींबद्दल भाष्य केलं आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातील एका प्रसंगाचा उल्लेख करत तिने सांगितलं होतं की, तिच्या इंग्रजीवरून तिची खिल्ली उडवण्यात आली होती.

या अनुभवाबद्दल बोलताना कंगनाने म्हटलं होतं की, इंग्रजी बोलता येत नाही म्हणून कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीची खिल्ली उडवली जाऊ नये, हा धडा तिने या अनुभवातून घेतला.

कंगनाने पुढे तिच्या वयाच्या २४व्या वर्षी सार्वजनिकरित्या झालेल्या टीका आणि अपमानाचा उल्लेख करत, त्या परिस्थितीतही तिने शालीनता, समजूतदारपणा, विनोदबुद्धी आणि विनयशीलता कायम ठेवली असल्याचं म्हटलं होतं.

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..

अभिजीत दीपके यांनीही दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी रविवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून इंग्रजी बोलण्याबाबत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

एका चाहत्याने “इंग्रजी बोलताना तुम्ही का संकोच करता?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर दीपके यांनी कॅमेऱ्यासमोर बोलताना आपल्याला काहीसं अस्वस्थ वाटत असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, कंगनाने शेअर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर दोघांच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीची चर्चा रंगली आहे.

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!

Web Title: Kangana ranaut abhijeet english comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Entertainemnt News
  • kanagana ranaut

संबंधित बातम्या

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी
1

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..
2

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!
3

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?
4

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.