
farah khan(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आज जगभरात ‘वर्ल्ड टेलिव्हिजन डे’ (World Television Day) साजरा केला जात असताना, टीव्ही विश्वातील एका नव्या आणि बहुप्रतिक्षित मालिकेचा लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला. एकता कपूर निर्मित आणि गौरव खन्ना व श्रद्धा आर्या यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दिल की बेवफाइयां’ या नव्या मालिकेच्या लॉन्चिंग प्रसंगी बॉलिवूडची सुप्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिने विशेष हजेरी लावली होती. येत्या २४ नोव्हेंबरपासून ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Farah Khan:
Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय
या खास संवादादरम्यान फराह खाननं बालपणीच्या दिवसांची आठवण सांगत आपल्या मिश्किल आणि बिनधास्त शैलीत जुने किस्से शेअर केले. यावेळी गौरव आणि श्रद्धासोबत गप्पा मारताना फराहानं दूरदर्शनवरील गाजलेल्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती हसत म्हणाली की, लहानपणी आम्ही टीव्हीवर आवर्जून ‘आमची माती आमची माणसं’ बघायचो. तिच्या या खास आणि मराठी मातीशी जोडलेल्या आठवणीनं उपस्थितांची मनं जिंकली आणि कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली.
नातेसंबंधांतील गुंतागुंत, भावना आणि त्यातून घेतले जाणारे निर्णय यावर भाष्य करणाऱ्या मालिका देण्यासाठी एकता कपूर ओळखली जाते. याच परंपरेत भर घालणाऱ्या या मालिकेत गौरव खन्ना ‘मानव’च्या तर श्रद्धा आर्या ‘जानकी’च्या भूमिकेत दिसणार आहे. मानव आणि जानकीची ही भावनिक आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली गोष्ट अनुभवण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत. ‘दिल की बेवफाइयां’ ही मालिका येत्या २४ नोव्हेंबरपासून फक्त ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळणार आहे.