Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Kareena Kapoor Education: करीना कपूरने ११वी इयत्तेनंतर शिक्षण सोडलं होतं. शिक्षण पूर्ण न केल्याची आजही खंत असल्याचं तिने सांगितलं असून, मुलं तैमूर आणि जेह यांनी आधी शिक्षण पूर्ण करावं अशी तिची इच्छा आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 03, 2026 | 08:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kareena Kapoor Education: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ या चित्रपटात दिसणार आहे. आपल्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही ती कायम चर्चेत असते. मात्र, करीनाच्या शिक्षणाबाबतची एक गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. तिने ११वी इयत्तेनंतरच शिक्षण सोडलं होतं. एका मुलाखतीदरम्यान करीनाने याबाबत भाष्य करताना शिक्षण पूर्ण न केल्याची खंत व्यक्त केली.

चित्रपटांच्या ऑफर्समुळे सोडलं शिक्षण

हनुमान दास यांना दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने तिच्या शिक्षणाबद्दल खुलासा केला. चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्यामुळे तिने ११वीतच शिक्षण सोडल्याचं तिने सांगितलं. अभिनयात करिअर करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला; मात्र त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याची संधी तिला मिळाली नाही.

याबद्दल बोलताना करीना म्हणाली की, तिने शिक्षण कधीच पूर्ण केलं नाही आणि ही गोष्ट तिला आजही खटकते. तिच्यासमोर शिक्षण पूर्ण करण्याच्या संधी होत्या, मात्र तिने अभिनयाच्या क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

‘मला अभिनेत्री व्हायचं होतं, म्हणून…’

आपल्या निर्णयाबद्दल बोलताना करीनाने सांगितलं की, लोक तिची शिक्षणामुळे अनेकदा चेष्टा करतात. मात्र, तिला अभिनेत्री व्हायचं होतं आणि त्याच दिशेने तिने वाटचाल सुरू केली.

करीना म्हणाली, “मला अभिनेत्री व्हायचे होते, त्यामुळे मी त्याच दिशेने वाटचाल सुरू केली. मला जे करायचे होते ते मी केलं. मी माझ्या मनाचं ऐकलं.”

दोन मित्र, एक धोकादायक मिशन आणि भरपूर धमाल; VIBE चा Trailer Out! Kunal Khemu च्या ॲक्शन-कॉमेडीचा धमाका

मुलांनी आधी शिक्षण पूर्ण करावं

स्वतःचं शिक्षण पूर्ण करता न आल्याची खंत करीनाला आहे. त्यामुळेच आपल्या दोन्ही मुलांनी म्हणजेच तैमूर आणि जेह यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करावं, अशी तिची इच्छा आहे. मुलांनी आधी शिक्षण पूर्ण करून त्यानंतर आपल्या मनाप्रमाणे करिअरची दिशा निवडावी, असा तिचा सल्ला आहे.

वयाच्या १९व्या वर्षी केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

करीना कपूरने वयाच्या १९व्या वर्षी जेपी दत्ता यांच्या ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. ‘रिफ्युजी’ हा करीनाचा पहिला चित्रपट ठरला.

विशेष म्हणजे, करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूर हिनेही बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी शिक्षण पूर्ण केलं नव्हतं. करिश्माने वयाच्या १७व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Web Title: Kareena kapoor education 11th class taimur jeh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • education
  • Entertainemnt News
  • Kareena Kapoor

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा
1

Devendra Fadnavis: शिक्षणासाठी ९० हजार कोटींची तरतूद; शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याचा फडणवीसांचा दावा

CAT Exam Preparation: कॅट मॉक टेस्टमध्ये स्कोअर वाढत नाहीये? वापरा ‘हा’ ५-स्टेप फॉर्म्युला; पर्सेंटाइलमध्ये होईल मोठी वाढ!
2

CAT Exam Preparation: कॅट मॉक टेस्टमध्ये स्कोअर वाढत नाहीये? वापरा ‘हा’ ५-स्टेप फॉर्म्युला; पर्सेंटाइलमध्ये होईल मोठी वाढ!

NIFT Entrance Exam 2027: फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! NIFT प्रवेश परीक्षेचे ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू
3

NIFT Entrance Exam 2027: फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! NIFT प्रवेश परीक्षेचे ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू

Census Rules 1990 Amended: हायकोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारचे मोठे पाऊल; ‘या’ कारणामुळे खाजगी संस्थांमध्ये खळबळ!
4

Census Rules 1990 Amended: हायकोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारचे मोठे पाऊल; ‘या’ कारणामुळे खाजगी संस्थांमध्ये खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.