Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Kashmira Irani Pregnancy: अभिनेत्री कश्मीरा इराणीने वयाच्या ४०व्या वर्षी प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. अक्षत सक्सेनासोबत लग्नाच्या दोन वर्षांनी हे जोडपं पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 31, 2026 | 02:29 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kashmira Irani Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री कश्मीरा इराणी लवकरच आई होणार आहे. वयाच्या ४०व्या वर्षी तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कश्मीराने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. तिच्या या पोस्टनंतर चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कश्मीराने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये समुद्रकिनारी दोन नारळ ठेवलेले दिसत आहेत. एका नारळावर गुलाबी, तर दुसऱ्यावर निळ्या रंगाची कॅप असून दोन्ही नारळांना गॉगल लावण्यात आला आहे. या कॅपवर ‘Mom’ आणि ‘Dad’ असं लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो शेअर करत कश्मीराने कॅप्शनमध्ये ‘सध्याचं स्टेटस… लवकरच’ असं लिहिलं आहे.

कश्मीराच्या या गोड पोस्टनंतर सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिचे चाहते तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी कमेंट करत या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.

गौहर खाननेही केलं अभिनंदन

कश्मीराच्या पोस्टवर अभिनेत्री गौहर खानने कमेंट करत लिहिलं, “खूप खूप अभिनंदन. देव तुला नेहमी आनंदी आणि सुरक्षित ठेवो.” याशिवाय रिद्धिमा पंडितने हार्ट इमोजी शेअर करत कश्मीरासाठी आनंद व्यक्त केला. चाहत्यांनीही कमेंट्समध्ये या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लग्नाच्या दोन वर्षांनी येणार चिमुकला पाहुणा

कश्मीरा इराणीने अक्षत सक्सेनासोबत फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता हे जोडपं त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. कश्मीराने आपल्या प्रेग्नन्सीची बातमी अतिशय अनोख्या पद्धतीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!

वयाच्या १७व्या वर्षी आली मुंबईत

कश्मीरा इराणी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली होती. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे. Google, Tata Sky आणि Nerolac यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

२००७-०८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंबर धारा’ या टीव्ही शोमुळे तिला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर कश्मीराने बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं.

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?

‘रंगून’ आणि ‘टायगर जिंदा है’मध्ये केलं काम

कश्मीरा इराणीने २०१७ मध्ये ‘रंगून’ आणि सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतरही तिने विविध प्रोजेक्ट्समध्ये अभिनय केला. अलीकडेच ती ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात दिसली होती.

आता अभिनयासोबतच कश्मीरा आपल्या आयुष्यातील एका नव्या आणि सुंदर अध्यायाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या गुडन्यूजमुळे चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

 

Web Title: Kashmira irani pregnancy announcement baby news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.