Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharat Ek Dharmayudh Season 2 Announced: महाभारताचा रणसंग्राम पुन्हा रंगणार; JioHotstarकडून दुसऱ्या सीझनची घोषणा

Mahabharat Ek Dharmayudh Season 2 Announced: जिओहॉटस्टारने 'महाभारत: एक धर्मयुद्ध' या लोकप्रिय मालिकेच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. २४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या २५ भागांच्या सीझनमध्ये पांडवांचा पुढील प्रवास, त्यांच्यासमोरील आव्हाने, बदलत्या निष्ठा आणि धर्म-अधर्मातील संघर्ष पाहायला मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 07, 2026 | 10:56 AM
Mahabharat Ek Dharmayudh Season 2 Announced: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mahabharat Ek Dharmayudh Season 2 Announced: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’चा दुसरा सीझन जाहीर.
  • २४ नोव्हेंबरपासून जिओहॉटस्टारवर प्रीमियर.
  • २५ भागांचा सीझन, दर आठवड्याला नवे एपिसोड.

पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि आजही तितक्याच प्रासंगिक असणाऱ्या कथांमध्ये ‘महाभारत’ अग्रस्थानी आहे. कुटुंब, महत्त्वाकांक्षा, निष्ठा, संघर्ष आणि ‘धर्म’ या शाश्वत प्रश्नांची ही गाथा मानवी स्वभाव आणि मानवी भविष्याला आकार देणाऱ्या पर्यायांवर प्रकाश टाकते. आता याच महाकाव्याची भव्यता पुन्हा एकदा डिजिटल पडद्यावर अवतरणार आहे. जिओहॉटस्टारने आपल्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या २४ नोव्हेंबरपासून या नव्या सीझनचा प्रीमियर होणार आहे. Mahabharat Ek Dharmayudh Season 2 Announced:

अशा संघर्षाची पार्श्वभूमी तयार

या नव्या सीझनचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून, त्यात महाभारतातील सर्वात निर्णायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाची झलक पाहायला मिळत आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण आणि तिथे भगवान श्रीकृष्णाचे प्रकट होणे, तसेच ‘जेव्हा जेव्हा अधर्माचा अतिरेक होईल, तेव्हा मी अवतार घेईन’ हा त्यांचा संदेश महाभारताचा मूळ गाभा अधिक दृढ करतो. हा प्रसंग एका अशा संघर्षाची पार्श्वभूमी तयार करतो, जिथे धर्म आणि अधर्म यांमधील युद्ध व्यक्ती आणि संपूर्ण साम्राज्याचे भवितव्य ठरवते.

जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रोहित जयसिंह वैद यांनी या सीझनचे दिग्दर्शन केले आहे. या भागात पांडवांचा पुढील प्रवास दाखवण्यात येणार आहे, ज्यामध्ये त्यांना आयुष्यातील धोके, बदलणाऱ्या निष्ठा आणि जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.

Ventilator 2: दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा कामेरकर कुटुंबाची होणार भेट! ‘व्हेंटिलेटर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संपूर्ण वातावरणाला जिवंत

जिओस्टार आणि कलेक्टिव्ह स्टूडियोज हिस्ट्रीव्हर्स यांच्या भागीदारीतून साकारलेली ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ ही मालिका प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. विशेष म्हणजे, या मालिकेतील पात्रांना, भव्य सेटला आणि संपूर्ण वातावरणाला जिवंत करण्यासाठी अत्याधुनिक ‘एआय-पावर्ड व्हिज्युअलायझेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या एआई तंत्रज्ञान आणि प्रोडक्शनची धुरा ‘गॅलरी५’ ने सांभाळली असून, विजय सुब्रमण्यम हे या मालिकेचे निर्माते आहेत.

Rise and Fall 2 Winner: भाजपला रामराम, रिअॅलिटी शोमध्ये धमाका! शहजाद पूनावालाने पटकावले विजेतेपद

२५ भागांचा हा नवा आणि थरारक सीझन २४ नोव्हेंबरपासून ‘जिओहॉटस्टार’वर प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, दर आठवड्याला याचे नवे एपिसोड रिलीज केले जातील.

Web Title: Mahabharat ek dharmayudh season 2 premiere date jiohotstar november 24 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • JioHotstar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा
1

Kolhapur Gokul Milk Politics: कोल्हापूर तुमच्या अहंकाराची मस्ती उतरवणार!; सतेज पाटलांकडून आंदोलनाची घोषणा

Paraguay News : पॅराग्वेमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना यांच्या महाभियोगाची सिनेटमध्ये सुनावणी सुरू
2

Paraguay News : पॅराग्वेमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना यांच्या महाभियोगाची सिनेटमध्ये सुनावणी सुरू

Sangli News : सांगली पोलीस दलाला मिळणार नवी ताकद! ३.१९ कोटींच्या निधीतून २७ वाहनांचे लोकार्पण
3

Sangli News : सांगली पोलीस दलाला मिळणार नवी ताकद! ३.१९ कोटींच्या निधीतून २७ वाहनांचे लोकार्पण

UK News : रसेल ब्रँड लैंगिक गुन्ह्यांत दोषी; ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सत्तेच्या गैरवापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

UK News : रसेल ब्रँड लैंगिक गुन्ह्यांत दोषी; ब्रिटिश मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सत्तेच्या गैरवापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.