Rise and Fall 2 Winner: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्ष सोडल्यानंतर राईज अँड फॉल 2 मध्ये एन्ट्री केली होती. आणि बघता बघता त्यांनी अख्खा शोच जिंकून टाकला. वीरेंद्र सेहवागने होस्ट केलेल्या या शोला अखेर त्याचा नवा अल्टीमेट रुलर मिळालाय.
15 सेलिब्रिटींना मागे टाकत शहजादने फक्त ट्रॉफीच नाही तर 35 लाख रुपयांचं रोख बक्षीस पण पटकावलंय. दुसरीकडे टीव्हीची लाडकी अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी फर्स्ट रनर-अप झाली आणि गौतम गुलाटी सेकंड रनर-अप झाला.Rise and Fall 2 Winner:
ग्रँड फिनालेची संध्याकाळ एकदम धमाकेदार होती. सुरुवातच टॉप 6 फायनलिस्टच्या स्टेज परफॉर्मन्सने झाली. जुने कंटेस्टेंट पण आले होते, सगळ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
कॉमेडियन हर्ष गुजरालने आपल्या जोक्सने सगळ्यांना खूप हसवलं. फायनलिस्टच्या घरच्यांना बघून वातावरण थोडं भावूक पण झालं होतं. पण खेळ आहे म्हटल्यावर ट्विस्ट येणारच.फॉर्च्यून फ्लोर पिरामिड चॅलेंजमध्ये निहारिका तिवारी मागे पडली आणि ती एलिमिनेट झाली. तिच्या जाण्याने टॉवरला त्याचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले.
टॉप 5 मध्ये तर स्पर्धा अजूनच वाढली होती. सगळे ट्रॉफीकडे डोळे लावून बसले होते. तेवढ्यात टॉवरचे दिवे लाल झाले. म्हणजे आता पुन्हा एलिमिनेशन होणार.
यावेळी शोचा सगळ्यात हुशार खेळाडू मानला जाणारा करण पटेल आणि रोखठोक बोलण्यासाठी फेमस असलेली स्वरा भास्कर हे दोघेही बाहेर झाले. दोघेही स्ट्राँग खेळाडू होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला.आता राहिले फक्त तीन. शहजाद पूनावाला, प्रियंका चहर चौधरी आणि गौतम गुलाटी. तिघांपैकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
शेवटी बाजी मारली ती शहजादने. ट्रॉफी हातात आल्यावर त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. तो म्हणाला, “राईज अँड फॉल 2 जिंकणं हे शब्दात सांगणं कठीण आहे. टॉवरच्या वरच्या मजल्यापासून ते बेसमेंटच्या टेन्शनपर्यंत, सगळा प्रवास खूप अवघड होता.””प्रत्येक टप्प्यावर मला स्वतःला बदलावं लागलं. कधी कधी मनात शंका पण आली, पण मला नेहमी वाटायचं मी हे करून दाखवेन. या मंचासाठी मी मेकर्स, प्राईम व्हिडिओ आणि बनिजय एशियाचा मनापासून आभारी आहे.”
Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराला धमकीचा मेल; ‘जलसा’ बंगल्याची पोलिसांकडून तपासणी
खरं तर शहजादचा खेळ सुरुवातीपासूनच वेगळा होता. तो शांत राहून खेळायचा, पण योग्य वेळी डाव टाकायचा. त्यामुळेच तो शेवटपर्यंत टिकला.प्रियंकाने पण खूप चांगला खेळ केला. शेवटपर्यंत ती शहजादला टक्कर देत होती. गौतम पण मागे नव्हता. पण शेवटी नशीब आणि खेळ दोन्ही शहजादच्या बाजूने होतं.या सीझनने प्रेक्षकांना खूप एंटरटेन केलं. भांडणं, मैत्री, गेम, इमोशन सगळं काही होतं. आता पुढचा सीझन कधी येणार याची सगळे वाट बघतायत.






