Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cultural Heritage : यात्रा-उत्सव हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे आधारस्तंभ; आशिष शेलार यांचे प्रतिपादन

Cultural heritage : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गावोगावी साजरे होणारे यात्रा-उत्सव हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे, सामाजिक एकतेचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 09, 2026 | 08:20 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • यात्रांच्या माध्यमातून गावातील नागरिक एकत्र येतात 
  • परंपरांचे संवर्धन करणे ही काळाची गरज 
  • पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रकाशनाला विशेष महत्त्व
 

Cultural heritage :  गावोगावी साजऱ्या होणाऱ्या यात्रा आणि उत्सव हे केवळ धार्मिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम नसून, ते महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे, सामाजिक एकतेचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. गावातील देवदेवता, लोककला, नृत्य, संगीत, परंपरा आणि सामूहिक सहभाग यांमधून ग्रामीण समाजाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होत असते. या परंपरांचे जतन करतानाच गावांचा सर्वांगीण विकास आणि आधुनिक व्यवस्थांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या दर्शनिका विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ‘राज्य गॅझेटिअर’मधील ‘यात्रा व उत्सव कोकण विभाग’, ‘यात्रा व उत्सव : पश्चिम महाराष्ट्र’ आणि ‘वैदिक जलविज्ञान’ या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. या ग्रंथांचे प्रकाशन ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

यात्रांच्या माध्यमातून गावातील नागरिक एकत्र येतात

गावातील यात्रा आणि उत्सव हे त्या गावाच्या सांस्कृतिक ओळखीचे अविभाज्य अंग असतात. या उत्सवांमधून पारंपरिक कला, नृत्य, संगीत आणि लोकजीवनाचे विविध पैलू पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. यात्रांच्या माध्यमातून गावातील नागरिक एकत्र येतात, सामाजिक संबंध दृढ होतात आणि सामूहिक सहभागाची भावना वाढीस लागते. या परंपरांचे दस्तऐवजीकरण आणि अभ्यास झाल्यास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

परंपरांचे संवर्धन करणे ही काळाची गरज

यात्रा-उत्सवांचा संबंध केवळ श्रद्धा आणि परंपरेपुरता मर्यादित नसून, त्यातून स्थानिक कलाकार, कारागीर, लघुव्यावसायिक आणि विविध सेवा पुरविणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. स्थानिक कला आणि कलाकृतींना प्रोत्साहन देत या परंपरांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रकाशनाला विशेष महत्त्व

महाराष्ट्राच्या विविध भागांतील यात्रा, उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती संकलित करणारे हे ग्रंथ संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या प्रकाशनाला विशेष महत्त्व आहे.

या कार्यक्रमाला दर्शनिका विभागाच्या कार्यकारी संपादक व सचिव डॉ. सायली पिंपळे यांच्यासह संशोधक लेखिका डॉ अनिता राणे, डॉ सुवर्णा चवरे, डॉ. बलसेकर, डॉ. प्राची मोघे, महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचे सचिव सचिन निंबाळकर याच्यासह या संबंधित अधिकारी, अभ्यासक आणि निमंत्रित उपस्थित होते.

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Web Title: Maharashtra village festivals cultural heritage ashish shelar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • maharashtra shahir

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.