Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwidha Movie: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात, पाहण्याचं ‘शास्त्र असतं ते’

Dwidha Movie: भाडिपामधून ‘शास्त्र असतं ते’ म्हणत घराघरात पोहचलेली अभिनेत्री रेणुका दफ्तरदार आता द्विधा चित्रपटातून एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 25, 2026 | 07:58 PM
द्विधामध्ये रेणुका दफ्तरदारची वेगळी भूमिका

द्विधामध्ये रेणुका दफ्तरदारची वेगळी भूमिका

Follow Us
Follow Us:
  • द्विधा चित्रपटात दिसणार रेणुका दफ्तरदार 
  • वेगळ्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या समोर 
  • ४ सप्टेंबरला होणार चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित 
Dwidha Movie: ‘शास्त्र असतं ते…’ हे वाक्य ऐकलं की आपल्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आठवते ती अनी आणि जुईची आई. आपल्या घरातलीच एक आई वाटावी, अशी सहजसुंदर भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांनी आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. 

‘दोघी’, ‘बाधा’, ‘वळू’, ‘मन फकिरा’, ‘अनन्या’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’ यांसारख्या चित्रपटांसह विविध नाटकं  आणि चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता रेणुका दफ्तरदार ‘द्विधा’ या आगामी चित्रपटातून एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन निलेश भास्कर नाईक यांचे असून, निर्मिती विदुला रमेश आजगावकर यांनी केली आहे. ४ सप्टेंबरला ‘द्विधा’ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Dwidha Movie: रिअल ते रील… ‘द्विधा’मध्ये दिसणार मायलेकीचं खास बॉन्डिंग; मानसी कुलकर्णींची लेक ओवी करणार अभिनयात पदार्पण

बेबी आत्याच्या रुपात येणार समोर 

‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार ‘बेबी आत्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहेत. प्रेमळ, समजूतदार आणि मायेने भरलेली ‘बेबी आत्या’ कुटुंबाचा भावनिक आधारस्तंभ आहे. पतीच्या निधनानंतर एकटं आयुष्य जगणाऱ्या ‘बेबी आत्या’ साठी तिचा भाऊ हाच सर्वात मोठा आधार आहे. भावासोबत खंबीरपणे उभं राहत ती घराची आणि कुटुंबाची मनापासून काळजी घेते. स्वतःच्या दुःखांना मनात दडवूनही ती कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी कायम खंबीरपणे उभी राहते. चित्रपटात त्यांच्यासोबत सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

काय म्हणाल्या रेणुका दफ्तरदार 

या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रेणुका दफ्तरदार यांनी सांगितलं की,  ‘आजवर साकारलेल्या विविध भूमिकांपेक्षा ‘द्विधा’मधील ‘बेबी आत्या’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मायेच्या ऊबेसोबतच आयुष्याने दिलेल्या दुःखांना सामोरं जाणारी, शांतपणे कुटुंबाचा भार पेलणारी आणि नात्यांना जपणारी ही आत्या ‘द्विधा’च्या कथानकातील महत्त्वाची भावनिक कडी ठरणार आहे’. आतापर्यंत रेणुका दफ्तरदार यांना प्रेक्षकांनी नेहमी हसवताना आणि आईच्या भूमिकेत पाहिलं आहे. त्यांचं कॉमेडी टायमिंग अत्यंत उत्तम आहे. पण पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या भूमिकेत प्रेक्षक रेणुका दफ्तरदार यांना पाहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही आता उत्सुकता लागून राहिली आहे. 

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Web Title: Actress renuka daftardar will see in dwidha movie in different role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Entertainment News
  • latest movies
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज;  ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी
2

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती
3

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत
4

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.