Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff: टायगरवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावला ‘बिग बॉस’ विजेता; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील गोळीबारावेळी करणवीर मेहरा घटनास्थळी असल्याचे वृत्त आहे. अभिनेत्याने या घटनेचा थरारक अनुभव सांगितल्याचा दावा केला जात आहे

  • By अमृता यादव
Updated On: Oct 19, 2026 | 11:10 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tiger Shroff:  मुंबईत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या वृत्तानंतर मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रकरणाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अभिनेत्री दिशा पटानी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’चा विजेता आणि अभिनेता करणवीर मेहरा याने या घटनेचा प्रत्यक्ष अनुभव सांगितल्याचा दावा केला जात आहे. गोळीबाराच्या काही वेळ आधी टायगर आणि करणवीर फुटबॉल खेळत होते, अशी माहितीही समोर आली आहे.

गोळीबाराच्या वेळी करणवीर मेहरा होता घटनास्थळी

मिळालेल्या वृत्तानुसार, करणवीर मेहरा याची गाडी टायगर श्रॉफच्या गाडीच्या मागे होती. घटनेच्या वेळी तो आपल्या कारमध्ये होता, तर टायगरची गाडी काही अंतरावर पुढे जात होती. स्टेडियमच्या बाहेर चाहते आणि नागरिकांची गर्दी जमली होती. त्याचवेळी अचानक तीन ते चार गोळ्या झाडल्याचा आवाज आला.

सुरुवातीला नेमकं काय घडलं, हे कोणालाही समजलं नाही. मात्र, काही क्षणांतच हा फटाक्यांचा आवाज नसून गोळीबार असल्याचं लक्षात आलं. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

‘सगळं इतक्या पटकन घडलं की…’

या घटनेबद्दल सांगताना करणवीर मेहराने परिस्थिती किती भयावह होती, याचा उल्लेख केल्याचं वृत्त आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सर्व काही इतक्या वेगाने घडलं की उपस्थितांना प्रतिक्रिया देण्याची संधीच मिळाली नाही.

गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. काही वेळापूर्वी आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी थांबलेले चाहते आणि नागरिक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावू लागले. घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाला. गोळ्या कोणत्या दिशेने झाडल्या जात होत्या किंवा हल्लेखोर कोण होते, याबाबत सुरुवातीला कोणालाही स्पष्ट माहिती नव्हती.

Sunny Deol Birthday: शाहरुखसमोर फाडली जीन्स, दिग्दर्शकाशीही झाला वाद; सनी देओलचे भन्नाट किस्से चर्चेत!

गोळीबारात दोघे जखमी झाल्याची माहिती

दिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. समोर आलेल्या वृत्तानुसार, टायगर श्रॉफ या घटनेतून सुखरूप बचावला; मात्र कारचालक आणि एका रिक्षाचालकाला दुखापत झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासात महत्त्वाचे ठरू शकतात. या घटनेमागील कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title: Tiger shroff firing karan veer mehra eyewitness account ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • entertainment
  • firing
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट
1

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Sunny Deol Birthday: शाहरुखसमोर फाडली जीन्स, दिग्दर्शकाशीही झाला वाद; सनी देओलचे भन्नाट किस्से चर्चेत!
2

Sunny Deol Birthday: शाहरुखसमोर फाडली जीन्स, दिग्दर्शकाशीही झाला वाद; सनी देओलचे भन्नाट किस्से चर्चेत!

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर CCTV मध्ये कैद, दोन संशयितांचे फोटो समोर
3

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर CCTV मध्ये कैद, दोन संशयितांचे फोटो समोर

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल
4

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.