Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cup Bashi Trailer : पत्रिकेच्या अटीतून उलगडणार नात्यांची ट्विस्टेड गोष्ट; ‘कप बशी’चा रंजक ट्रेलर प्रदर्शित

कप बशी Trailer: आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या नात्यातील अनोखी आणि ट्विस्टेड गोष्ट सांगणारा ‘कप बशी’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. 19 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2026 | 08:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या विषयांवरील चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळत आली आहे. अशाच एका अनोख्या संकल्पनेवर आधारित ‘कप बशी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या हटके कथानकामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या नात्यातील भावनिक, विनोदी आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 19 जून रोजी हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होणार आहे.

इतिहासाचा प्रेरणादायी संघर्ष रंगमंचावर, ‘पाण्याने पेटला वणवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चवदार तळे सत्याग्रहाचा संघर्ष उलगडणार

‘कप बशी’चे आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेता ऋषी मनोहर आणि अभिनेत्री पूजा सावंत ही नवी जोडी. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांची दमदार उपस्थिती चित्रपटाला वेगळी उंची देताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये विनोद, भावना आणि कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्रने केली असून कल्पक सदानंद जोशी हे निर्माते आहेत. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश रामगोपाल राठी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चेतन सैंदाणे यांनी पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी सांभाळली असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी केले आहे.

चित्रपटाच्या संगीताची धुरा प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच त्यांच्या संगीताचा ठसा उमटणार आहे. गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांना उत्तम सिंग यांच्या संगीताची साथ लाभली आहे. बाळू दहिफळे यांनी छायाचित्रण, तर आशिष म्हात्रे यांनी संकलन केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजन, तर श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनिंगचे काम केले आहे. चित्रपटात निर्मिती सावंत, पूजा सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेतून कथेला अधिक रंगत आणल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट दिसून येते.

‘कप बशी’ची कथा एका अनोख्या अटीभोवती फिरते. लग्न जुळवताना वधू-वरांची पत्रिका जुळवण्याची परंपरा सर्वश्रुत आहे. मात्र, या चित्रपटातील उच्चशिक्षित आणि रेडिओ जॉकी असलेली नायिका लग्नासाठी एक वेगळीच अट ठेवते. ती होणाऱ्या नवऱ्याऐवजी त्याच्या आईशी पत्रिका जुळवण्याचा आग्रह धरते. या विचित्र वाटणाऱ्या अटीमुळे पुढे अनेक गंमतीशीर, भावनिक आणि नात्यांची परीक्षा घेणारे प्रसंग घडतात.

Yed Lagla Premacha : मालिका क्षेत्रात सुप्रसिद्ध लावण्यवतीची एंट्री! ‘येडं लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार लावणी सम्राज्ञी…


ट्रेलरमध्ये या संकल्पनेची झलक पाहायला मिळते. एका साध्या परंपरेतून नातेसंबंधांचे विविध पैलू उलगडत जातात. सासू-सुनेचे नाते, मुलाचे द्विधा मनस्थितीत अडकणे आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या प्रतिक्रिया यामुळे कथेला वेगळीच रंगत प्राप्त होते. खुसखुशीत संवाद आणि दमदार अभिनयामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. चित्रपटाचे शीर्षक, कथानक आणि कलाकारांची फळी यामुळे ‘कप बशी’ हा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा ठरताना दिसतो. कौटुंबिक नात्यांवर भाष्य करताना विनोद आणि भावनांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे 19 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. नात्यांची ही ट्विस्टेड पण मनाला भिडणारी गोष्ट बॉक्स ऑफिसवर किती जादू दाखवते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Cup bashi marathi movie trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • hit movies
  • latest movies
  • Official Trailer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.