Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dharau Marathi Movie: ‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ या लक्षवेधी टॅगलाइनसह ‘धाराऊ’ मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. चित्रपट २३ ऑक्टोबरला रिलीज होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 02, 2026 | 05:32 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Dharau Marathi Movie:  गोमातेप्रती असलेली श्रद्धा, भारतीय संस्कृतीतील तिचं महत्त्व आणि माणूस व गोमाता यांच्यातील भावनिक नातं उलगडणारा ‘धाराऊ’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!” या लक्षवेधी टॅगलाइनसह चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. पोस्टर समोर येताच चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून, येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

गोमातेचं महत्त्व उलगडणार ‘धाराऊ’

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत ‘धाराऊ’ या चित्रपटातून गोमातेप्रती असलेली श्रद्धा आणि तिच्याशी जोडलेल्या भावनिक नात्याचा संवेदनशील वेध घेण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीत गाईला केवळ प्राणी म्हणून न पाहता आईसमान मानलं जातं. याच भावनेला केंद्रस्थानी ठेवून गोमातेचं सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मनिष सुरेश शिंदे यांचा पहिलाच मराठी चित्रपट

लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांचा ‘धाराऊ’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी संपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. चित्रपटाविषयी बोलताना मनिष शिंदे म्हणाले, “लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘धाराऊ’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. भारतीय संस्कृतीत गाईला केवळ एक प्राणी म्हणून पाहिलं जात नाही, तर तिला आईसमान मानलं जातं. याच भावनेला केंद्रस्थानी ठेवून गोमातेचं महत्त्व, तिच्याविषयीची संवेदना आणि समाजातील तिचं स्थान यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘धाराऊ’मधून करण्यात आला आहे.”

ते पुढे म्हणाले की, या विषयाच्या माध्यमातून समाजात जनजागृती आणि प्रबोधन निर्माण व्हावं, तसेच गोमातेशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, हा चित्रपटामागील प्रमुख उद्देश आहे.

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

चित्रपटाला महोत्सवांमध्ये १५ पुरस्कार

‘धाराऊ’ हा चित्रपट दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. या चित्रपटाला विविध चित्रपट महोत्सवांमध्ये तब्बल १५ पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. या यशामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट केवळ एका विषयापुरता मर्यादित न राहता, प्रेक्षकांना भावनिक पातळीवर जोडणारा आणि विचार करायला प्रवृत्त करणारा अनुभव ठरेल, असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.

२३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमुळे ‘धाराऊ’विषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘धाराऊ’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?

Web Title: Dharau marathi movie motion poster release ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
1

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
3

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात
4

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.