Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2 : प्रवीण तरडेंसाठी लांजेकरांची खास पोस्ट! ‘मराठी सिनेमाचा झेंडा…’ सिनेसृष्टीतून कौतुकाची थाप

'देऊळबंद 2' हा मराठी सिनेमा 100 कोटींच्या टप्प्यापासून अवघ्या 1.30 कोटी रुपयांच्या अंतरावर असून, पाच आठवड्यांत त्याने 98.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा टप्पा गाठताच मराठी चित्रपटसृष्टीतील 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा तो तिसरा चित्रपट ठरणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2026 | 07:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • फक्त 1.30 कोटींचा आकडा शिल्लक आहे.
  • सिनेविश्वातील दिग्गजांनी सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडेची पाठ थोपटण्यास सुरुवात केली आहे.
  • प्रवीण तरडेसाठी खास सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
देऊळ बंद सिनेमा यशाच्या उच्च शिखरावर आहे. जसजसे मराठी सिनेमे हे उच्च शिखर गाठतील त्याचप्रमाणे मराठी सिनेसृष्टीही यशाच्या उंच शिखरावर पोहचत जाईल. प्रवीण तरडे यांचा देऊळबंद 2 सिनेमा आता सध्या चर्चेच्या झोत्यात आहे. सिनेमा लवकरच 100 कोटींचा आकडा गाठणार आहे. 5 आठवड्यात सिनेमाने 98.70 कोटींचा आकडा गाठला आहे फक्त 1.30 कोटींचा आकडा शिल्लक आहे. या नंतर हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करणारा मराठी सिनेविश्वातील तिसरा सिनेमा ठरेल.

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम   

 

सिनेमाने 100 कोटी गाठण्याआधीच सिनेविश्वातील दिग्गजांनी सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडेची पाठ थोपटण्यास सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी प्रवीण तरडेसाठी खास सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, “‘देऊळ बंद २’ ने १०० कोटींचा टप्पा पूर्ण केला, ही बातमी ऐकताना मनापासून आनंद झाला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा केवळ एक व्यावसायिक आकडा नाही; हा आपल्या मातीतल्या कथांवर, आपल्या मातीतल्या कलाकारांवर आणि आपल्या मातीतल्या प्रेक्षकांच्या भावविश्वावर ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल परमस्नेही प्रवीण दादा यांचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रवीण दादा हे नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो मातीचा गंध. त्यांची भाषा मातीची, त्यांचा स्वभाव मातीचा, त्यांची पात्रं मातीची आणि त्यांची कथाही थेट माणसाच्या मनातून उगवलेली असते. ते जे काही करतात, त्यात कृत्रिमपणा नसतो; त्यात घाम असतो, श्रद्धा असते, संघर्ष असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी असते.‘देऊळ बंद २’ ने तेच सिद्ध करून दाखवलं आहे. प्रवीण दादांबद्दल एक आठवण माझ्या मनात कायम जपून ठेवण्यासारखी आहे. ‘मुक्ताई’मध्ये वारकरी परंपरेचा मान राखण्यासाठी प्रवीण दादांनी विनामूल्य भूमिका केली होती. हा फक्त एका कलाकाराचा सहभाग नव्हता; ही त्या परंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा होती, संतविचारांविषयीचा त्यांचा आदर होता आणि आपल्या संस्कृतीशी असलेली त्यांची प्रामाणिक बांधिलकी होती. आजच्या काळात, प्रत्येक गोष्टीचे व्यावसायिक मोजमाप होत असताना, प्रवीण दादांनी दाखवलेला हा भाव माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. कारण अशा कृती शब्दांपेक्षा मोठ्या असतात. प्रवीण दादा भेटले की नेहमी एक आपलेपणा जाणवतो. त्यांच्या बोलण्यात रांगडेपणा असतो, पण मनात विलक्षण संवेदनशीलता असते.म्हणूनच ‘देऊळ बंद २’ च्या १०० कोटींच्या यशाचा आनंद माझ्यासाठी केवळ शुभेच्छांचा विषय नाही; तो आपल्या माणसाच्या विजयाचा अभिमान आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आज अशा यशांची गरज आहे. कारण ही यशं सांगतात की आपली भाषा, आपली माती, आपली श्रद्धा, आपले संघर्ष आणि आपले कलाकार यांच्यात अजूनही अफाट ताकद आहे. फक्त ती प्रामाणिकपणे पडद्यावर यायला हवी. प्रवीण दादांनी ही प्रामाणिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आणि याला त्यांच्या अर्धांगिनीची… विदुषी स्नेहलताईंची सार्थ साथ मिळालेली आहे… प्रवीण दादा, तुमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तुमचं हे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी आहे आणि आमच्यासारख्या सहप्रवाशांसाठी अभिमानाचं आहे. तुमच्या हातून अशीच मातीशी जोडलेली, माणसांच्या मनात घर करणारी आणि मराठी सिनेमाचा झेंडा उंच नेणारी कार्यं सतत घडत राहोत, हीच मनापासून शुभेच्छा.”

 

Kiran Gaikwad : अभिनेत्याने प्रवीण तरडेसाठी केली खास पोस्ट! दिग्दर्शकाशी विशेष नाते; ‘जगाला ओरडून सांगावंसं वाटतं…’

लांजेकरांची ही भावनिक पोस्ट पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. तसेच प्रवीण तरडे आणि संपूर्ण देऊळबंद 2 टीमचे कौतुक करण्यात येत आहे. सिनेमा सध्या मराठी सिनेविश्वातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: Digpal lanjekar posted to celebrate the success of deool band 2 and pravin tarde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Marathi celebrities
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’
1

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’

Kiran Gaikwad : अभिनेत्याने प्रवीण तरडेसाठी केली खास पोस्ट! दिग्दर्शकाशी विशेष नाते; ‘जगाला ओरडून सांगावंसं वाटतं…’
2

Kiran Gaikwad : अभिनेत्याने प्रवीण तरडेसाठी केली खास पोस्ट! दिग्दर्शकाशी विशेष नाते; ‘जगाला ओरडून सांगावंसं वाटतं…’

Mumbai Local Train Murder : मयंक हत्ये प्रकरणावर व्यक्त झाला सुप्रसिद्ध अभिनेता! पोस्ट करत बघ्यांना सुनावले खडेबोल
3

Mumbai Local Train Murder : मयंक हत्ये प्रकरणावर व्यक्त झाला सुप्रसिद्ध अभिनेता! पोस्ट करत बघ्यांना सुनावले खडेबोल

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!
4

Mira Jagannath : जिंकलस गं पोरी! ‘स्वप्न महाग नसतात, जिद्द अपुरी असते’ अभिनेत्रीचं नवं घर अन् नव्या घराची वास्तुशांती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.