Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party ला दिग्दर्शक हेमंत ढोमेचा पाठिंबा; म्हणाला, “लोकशाहीसाठी हा सकारात्मक संकेत!”

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ला प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ही चळवळ लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 21, 2026 | 06:47 PM
Cockroach Janata Party ला दिग्दर्शक हेमंत ढोमेचा पाठिंबा (Photo Credit- X)

Cockroach Janata Party ला दिग्दर्शक हेमंत ढोमेचा पाठिंबा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • ‘कॉकरोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ
  • प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत ढोमे मैदानात
  • विरोधकांना सुनावले खडेबोल!
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janata Party – CJP) नावाच्या एका डिजिटल चळवळीने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आजच्या ‘जेन-झी’ (Gen-Z) म्हणजेच तरुण पिढीमध्ये या उपरोधात्मक आंदोलनाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या डिजिटल पार्टीची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, इन्स्टाग्रामवर या पेजच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल १.१३ कोटींच्या (11.3 Million) पार गेली आहे. आता या अनोख्या चळवळीला चित्रपटसृष्टीतूनही मोठा पाठिंबा मिळत असून, प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) याचे स्वागत करत याला ‘लोकशाहीसाठी एक सुदृढ संकेत’ म्हटले आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची सडेतोड भूमिका

दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा स्क्रीनशॉट शेअर करत, या चळवळीवर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी लिहिले की, “जे लोक या डिजिटल आंदोलनाचा विरोध करत आहेत, त्यांच्या विचारसरणीची दया येते. अशा व्यवस्थेमध्ये जिथे सामान्य लोक प्रश्न विचारणेच विसरून गेले होते, तिथे जर आशेचा एखादा किरण दिसत असेल, तर ते लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक आहे. आपण सर्वांनी याचे स्वागत केले पाहिजे.”

कॅाजपा ला आत्ताच (राजकीय) विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची किव येते…
एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात ही आशा सोडलेल्या समाजात जर एक आशेचा किरण दिसतो आहे तर ही सुदृढ लोकशाही साठी अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक अशी बाब आहे. ज्याचं स्वागत माझ्या… pic.twitter.com/PcjDtCbHhN
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 21, 2026

ढोमे यांनी पुढे नमूद केले की, “भविष्यात जरी आंदोलनांचे स्वरूप बदलले, तरीही सध्याच्या घडीला ही डिजिटल पार्टी ज्या प्रकारे जनतेच्या आणि तरुणांच्या हक्काचे प्रश्न मांडत आहे, ते कौतुकास्पद आहे.” या चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांनी भविष्यातही जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी

नेमकी काय आहे ही ‘कॉकरोच जनता पार्टी’?

मे २०२६ मध्ये सुरू झालेली ही उपरोधात्मक चळवळ देशातील बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या इतर गंभीर मुद्द्यांवर डिजिटल माध्यमातून तीव्र प्रहार करत आहे. या पार्टीच्या स्थापनेची पार्श्वभूमी १५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीशी जोडलेली आहे. एका खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी चुकीच्या मार्गाने सिस्टीममध्ये घुसणाऱ्यांसाठी ‘कॉकरोच’ (झुरळ) या शब्दाचा वापर केला होता. याचाच निषेध म्हणून देशातील तरुणांनी एकत्र येत या शब्दाला थेट एका डिजिटल राजकीय पक्षाचे रूप दिले.

दिग्गज सेलिब्रिटींचा पाठिंबा आणि वाढती लोकप्रियता

अत्यंत कमी कालावधीत या डिजिटल पक्षाने देशातील अनेक मोठ्या राजकीय पक्षांना फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकले आहे. या आंदोलनाला केवळ सामान्य तरुणांचाच नव्हे, तर बॉलिवूड आणि कलाविश्वातील अनेक मोठ्या नामांकित हस्तकांचा पाठिंबा मिळाला आहे. यामध्ये दिया मिर्झा, अनुराग कश्यप आणि कोंकणा सेन शर्मा,ईशा गुप्ता, कुणाल कामरा आणि उर्फी जावेद आहे. महाराष्ट्रातील तरुण अभिजीत दिपके याने सुरू केलेली ही डिजिटल पार्टी स्वतःला ‘सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक आणि लेझी’ घोषित करते. आजचा तरुण आपली नाराजी, संताप आणि मागण्या मांडण्यासाठी डिजिटल व नाविन्यपूर्ण मार्गांचा किती प्रभावीपणे वापर करू शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन

Web Title: Director hemant dhome supports cockroach janata party digital movement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?
1

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप
2

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट
3

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष
4

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.