Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Independence Day 2026: फौजी चित्रपटाचा लुक स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला समोर आला आहे. हा चित्रपट देशभक्तीपर असणार असून २७ नोव्हेंबर, २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2026 | 10:30 PM
फौजी चित्रपटाचा पहिला लुक समोर

फौजी चित्रपटाचा पहिला लुक समोर

Follow Us
Follow Us:
  • स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी फौजीचा नवा लुक समोर 
  • मराठी चित्रपट होणार २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित 
  • निस्सीम देशसेवा दिसणार रुपेरी पडद्यावर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ उत्सव नाही, तर त्यामागे असलेल्या असंख्य शूरवीरांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव करून देणारा अभिमानाचा क्षण! सीमेवर जीवाची पर्वा न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या जवानांच्या शौर्याला आणि निस्सीम देशसेवेला रुपेरी पडद्यावर सलाम करणारा एकलव्य प्रतिष्ठान, सुधीरदादा पाटसकर प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष चर्चेत आला आहे. ‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ या दमदार टॅगलाईनसह ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना २७ नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार आहे. या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन ह.भ.प. घनशाम विष्णुपंत येडे यांनी केले आहे. स्वप्रजा विश्वनाथ नाथ या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

देशप्रेमावर आधारित चित्रपट 

देशप्रेम, शौर्य आणि मातृभूमीशी असलेली नाळ यांची प्रभावी झलक दाखवणाऱ्या ‘फौजी’ या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार लुक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या धैर्याची, त्यागाची आणि भावविश्वाची अंगावर काटा आणणारी कहाणी मांडणाऱ्या या चित्रपटात दोन जवानांच्या आयुष्याचा प्रवास केंद्रस्थानी आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणाऱ्या या वीरांची देशसेवा, संघर्ष आणि भावनिक प्रवास ‘फौजी’मधून प्रभावीपणे उलगडणार आहे.

फौजीतून उलगडणार भावनिक प्रवास 

सहनिर्मात्या स्वप्नजा विश्वनाथ नाथ म्हणाल्या, ‘देशासाठी स्वतःचा देह झिजवणाऱ्या त्या तमाम योद्ध्यांचे अश्रू, त्याग आणि त्यांच्या कुटुंबीयांची तगमग जेव्हा रुपेरी पडद्यावर साकारते, तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते आणि डोळे नकळत पाणावतात. ‘फौजी’ हा केवळ चित्रपट नाही, तर मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाला वाहिलेली भावपूर्ण मानवंदना आहे.

दिग्दर्शक ह.भ.प. घनशाम विष्णुपंत येडे म्हणाले की, सीमेवर बंदूक हातात घेऊन उभा असलेला जवान हा केवळ एक सैनिक नसतो, तर त्याच्या मागे त्याचे कुटुंब, नाती, स्वप्नं आणि मातृभूमीविषयीची अपार निष्ठा असते. हीच भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही ‘फौजी’च्या माध्यमातून केला आहे. ‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ ही केवळ चित्रपटाची टॅगलाईन नाही, तर या संपूर्ण कथेमागची भावना आहे.

Gia & Gauri New Webseries: रितिका श्रोत्रीचा नवा अंदाज; ‘जिया आणि गौरी’मध्ये साकारतेय दोन रंग

Web Title: Fauji movie new look on occasion of independence day 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:30 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
2

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
3

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.