Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Filmfare Marathi Awards 2026: मराठी सिनेसृष्टीतील मानाच्या पुरस्कारांचे विजेते जाहीर, ‘या’ चित्रपटाने जिंकले सर्वाधिक ८ पुरस्कार

Filmfare Marathi Awards 2026 मध्ये 'अता थांबायचं नाय!'ने ८ पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला आहे. दिलीप प्रभावळकर, अमृता सुभाष, हृता दुर्गुळे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह सर्व विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिलीप प्रभावळकर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता
  • अमृता सुभाष आणि हृता दुर्गुळे यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
  • ‘अता थांबायचं नाय!’चा पुरस्कारांवर दबदबा
Filmfare Marathi Awards 2026 : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६ सोहळ्याचा दिमाखदार समारंभ ६ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील उत्कृष्ट कलावंत आणि तंत्रज्ञांचा यावेळी गौरव करण्यात आला. अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

‘अता थांबायचं नाय!’चा पुरस्कारांवर दबदबा

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘अता थांबायचं नाय!’ या चित्रपटाने सर्वाधिक ८ पुरस्कार पटकावत बाजी मारली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शिवराज वायचळ), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सिद्धार्थ जाधव), सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे पुरस्कार मिळाले.

या यशानंतर दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी संपूर्ण टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच, फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याशी आपल्या वडिलांची जोडलेली आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

Siddharth Jadhav: फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर सिद्धार्थ जाधवचं हटके सेलिब्रेशन; ट्रॉफी बेडवर ठेवली अन्…

दिलीप प्रभावळकर, अमृता सुभाष आणि हृता दुर्गुळे यांचा गौरव

‘दशावतार’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांनी उभे राहून (Standing Ovation) त्यांना मानवंदना दिली.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) या विभागात ‘जारण’ चित्रपटासाठी अमृता सुभाष आणि ‘आरपार’ चित्रपटासाठी हृता दुर्गुळे यांना संयुक्तपणे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘गोंधळ’, ‘स्थळ – अ मॅच’ आणि ‘दशावतार’चीही चमकदार कामगिरी

‘गोंधळ’ चित्रपटाने एकूण ६ पुरस्कार पटकावले, तर ‘स्थळ – अ मॅच’ आणि ‘दशावतार’ या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी ५ पुरस्कार आपल्या नावावर केले.

‘स्थळ – अ मॅच’ आणि ‘साबर बोंडा’ या चित्रपटांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) पुरस्कार मिळाला. तसेच नंदिनी चिकटे यांना ‘स्थळ – अ मॅच’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक), तर भूषण मनोज (‘साबर बोंडा’) आणि तारणाथ खिरटकर (‘स्थळ – अ मॅच’) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) पुरस्कार मिळाला.

Jayanti 2 Teaser: शिक्षण व्यवस्थेतील वास्तव उलगडणार! ‘जयंती २’चा दमदार टीझर रिलीज, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

राजदत्त यांना जीवनगौरव पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत राजदत्त यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला अमृता फडणवीस, अनन्या पांडे, अभिषेक बॅनर्जी, सचिन पिळगांवकर, श्रिया पिळगांवकर, रिंकू राजगुरू, रेणुका शहाणे, प्रिया बापट, नेहा पेंडसे, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, अभिजीत सावंत यांच्यासह चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६ : प्रमुख विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट: अता थांबायचं नाय!
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: शिवराज वायचळ (अता थांबायचं नाय!)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: दिलीप प्रभावळकर (दशावतार)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अमृता सुभाष (जारण), हृता दुर्गुळे (आरपार)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: सिद्धार्थ जाधव (अता थांबायचं नाय!)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: अनिता दाते (जारण)
जीवनगौरव पुरस्कार: राजदत्त

Web Title: Filmfare marathi awards 2026 ata thambaycha naay won eight awards marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • awarded
  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
2

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.