Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका

स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 12, 2026 | 06:34 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भल्या-भल्यांना घाम फोडणारी ‘रंगी’ येतेय!
  • एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर
  • स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका
Ghabadkund Movie Trailer: बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एन्ट्री झाली आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदा होणार आहे. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

सत्ता विरुद्ध न्यायाचा संघर्ष, System चा दमदार ट्रेलर, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर

अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘रंगी’ नावाच्या व्यक्तिरेखेची एन्ट्री

‘रंगी’ असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. चित्रपटात ब्लॅक मॅजिक करताना दिसणारी ‘रंगी’ आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि भयावह उपस्थितीने कथानकात वेगळीच रंगत आणताना दिसणार आहे. “नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं रंगी…!” ही टॅगलाईन त्यांच्या व्यक्तिरेखेचं नेमकं वर्णन करते.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता सांगतात, ‘घबाडकुंड’मधील ‘रंगी’ ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे. थिएटरमधील अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मिळालेली समज या व्यक्तिरेखेला आकार देताना खूप उपयोगी पडली’. ब्लॅक मॅजिकच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच लक्षात राहील, अशा भावना स्मिता पायगुडे अंजुटे यांनी व्यक्त केल्या.

‘ दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार

घबाड़कुंड’ चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. या चित्रपटाचे गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिनगारे आणि साउंड डिझाइन मानव श्रोत्रिय यांचे आहे. ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच साकारत असलेल्या या ‘युनिव्हर्स’मुळे हा चित्रपट जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Web Title: Ghabadkund marathi movie first cinematic universe smita paigude anjute role details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
1

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज
2

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?
3

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप
4

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.