Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

Torang Project : कर्जतच्या सायडोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी ३२ हजार ४८० झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून सयाजी शिंदे चिपको आंदोलनात सहभागी होणार आहेत. वाढत्या विरोधामुळे झाडे कापणारे मजूर सध्या परिसरातून निघून गेले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 24, 2026 | 06:24 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ६४० एकर वनजमिनीवरील ३२ हजार झाडे तोडण्यास परवानगी
  • आदित्य ठाकरे आक्रमक; सयाजी शिंदेही चिपको आंदोलनात सहभागी होणार
  • वृक्षतोडीला विरोध वाढला; झाडे कापणारे मजूर निघून गेले
Torang Project :कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याने पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी वन विभागाने ६४० एकर वनजमिनीवरील तब्बल ३२ हजार ४८० झाडे तोडण्यास परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, हा परिसर संवेदनशील आणि संरक्षित वनक्षेत्र असल्याचे फलक वन विभागानेच लावले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवर स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या वृक्षतोडीविरोधात राजकीय नेत्यांनीही आवाज उठवला असून अभिनेते सयाजी शिंदे यांनी चिपको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

६४० एकर वनजमिनीवरील ३२ हजार झाडे तोडण्यास परवानगी

सायडोंगर परिसरातील राखीव वन सर्व्हे क्रमांक २८ आणि २९ मधील ६४० एकर जमीन टोरंट प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. या क्षेत्रातील ३२ हजार ४८० झाडे तोडण्याची परवानगी कर्जत वन विभागाने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्याचे सांगण्यात येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वृक्षतोडीला सुरुवात झाली.

पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मोखाडा तालुक्यांतून आलेले मजूर दररोज सुमारे ५०० झाडे तोडत असल्याची माहिती आहे. ही वृक्षतोड पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

आदित्य ठाकरे आक्रमक; सयाजी शिंदेही चिपको आंदोलनात सहभागी होणार

या वृक्षतोडीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. स्थानिकांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून हजारो झाडांची कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईसाठी महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जात आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. दरम्यान, कर्जत पर्यावरण बचाव समितीने या वृक्षतोडीविरोधात झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

ऊसदराचा तिढा सुटेना! स्वाभिमानी शेतकरी संघटना मागण्यांवर ठाम, ‘दर जाहीर करा नाहीतर..,’ Raju Shetty यांचा इशारा

वृक्षतोडीला विरोध वाढला; झाडे कापणारे मजूर निघून गेले

सायडोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीला स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. पर्यावरण बचाव समिती आणि नागरिकांकडून या कारवाईविरोधात आवाज उठवला जात आहे. विशेष म्हणजे, सायडोंगर परिसरात प्रवेश करण्यास मनाई असल्याचे फलक वन विभागाने लावले आहेत. एका बाजूला हा परिसर संवेदनशील आणि राखीव वनक्षेत्र असल्याचे फलक, तर दुसऱ्या बाजूला याच ठिकाणी वृक्षतोडीची परवानगी, यामुळे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, वृक्षतोडीला वाढता विरोध लक्षात घेऊन ठेकेदार कंपनीने वाडा आणि मोखाडा येथून आलेल्या झाडे कापणाऱ्या मजुरांना तेथून पाठवून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कालपासून सायडोंगर जंगलात वृक्षतोड करणारे मजूर दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हजारो झाडांवरील संकट अद्याप कायम असल्याने पुढील काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Web Title: An axe falls on a sensitive forest tree felling underway for torrent will the entire forest be razed to the ground within five monthscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • karjat news
  • Maharashtra Forest Department
  • Marathi News
  • tree cutting

संबंधित बातम्या

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला
1

World News :इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल
2

Ambadas Danve on Girish Mahajan: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल

Ashwini Mahangade Wedding ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?
3

Ashwini Mahangade Wedding ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेच्या लग्नाची धूम! कोणाच्या प्रेमात अडकली अभिनेत्री?

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य
4

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.